rat१६p३३.jpg-
91952
द रॉयल क्वीन ऑफ इंडिया ठरलेली विजेता मोर्ये.
विजेता मोर्ये ठरली दी रॉयल क्वीन ऑफ इंडिया
राष्ट्रीय स्तरावर दुहेरी कामगिरी : गृहिणी ते सौंदर्यवती अनन्यसाधारण प्रवास
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ः शहरातील मांडवी येथील पूर्वाश्रमीची अंकिता चौघुले आणि आताची कोलधे-कुंभारगाव (ता. लांजा) येथील विजेता मोर्ये हिने नुकत्याच झालेल्या राज्य आणि राष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत दुहेरी मुकुट पटकावत रत्नागिरीची मान उंचावली आहे. पुणे येथे झालेल्या मी होणार महाराष्ट्र सौंदर्यवती-सीझलिंग क्वीन २०२५ या राज्यस्पर्धेत ती विजेती ठरली तर पुणे येथील दी रॉयल ग्रुपतर्फे आयोजित "दी रॉयल क्वीन ऑफ इंडिया २०२५" या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेतही तिने विजेतेपद पटकावले आहे.
मोर्येचा प्रवास रत्नागिरीतील नवनिर्माण कॉलेजमध्ये मिस कॉन्टेस्टपासून सुरू झाला. त्यानंतर बहर युवा महोत्सव, लायन्स क्लब ऑफ मिस रत्नागिरी, व्यावसायिक समाजकार्य पदव्युत्तर पदवी कॉलेज आयोजित २०१८ उत्कर्ष क्वीन व एमएसडब्ल्यू कॉलेज आयोजित मिस जल्लोष २०१९ क्वीन व लग्नानंतर पहिले मिसेस श्रावण क्वीन ऑफ रत्नागिरी (पहिली रनरअप्), स्मार्ट श्रावणसखी २०२५ (दुसरी रनरअप्) या स्पर्धांतून तिचा आत्मविश्वास वाढत गेला. आता तिने राज्य व राष्ट्रीय पातळीवर आपली छाप उमटवली आहे. या यशाचे श्रेय तिने पती, आई, भाऊ, वहिनी, भाची तसेच पुण्यातील नणंद-परिवार (मांडवकर), सासर व माहेरचे नातेवाईक, मित्रमंडळी, हितचिंतक, गुरूजन तसेच दी रॉयल ग्रुपचे संचालक नितीन झगरे व आयोजक, कोरिओग्राफर व ग्रूमर यांना दिले आहे. रॉयल क्वीन ऑफ इंडिया २०२५ या किताबासोबत विजेताच्या डोक्यावर मलेशियाहून आणलेला तब्बल ४५ हजार रुपये किंमत असलेला रॉयल क्राऊन घालण्यात आला आहे.