अंबरनाथ पश्चिमेत नेताजी मार्केट परिसरात दोन संशयित व्यक्ती फिरताना आढळले.
हातात दांडके व टॉर्च घेऊन हे चोरटे रेनकोट घालून वावरताना आढळले
सीसीटीव्हीत संपूर्ण घटना कैद; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
पोलिस तपास सुरू; स्थानिकांकडून चोरट्यांचा शोध घेण्याची मागणी.
अंबरनाथ पश्चिमेतील नेताजी मार्केट परिसरात रात्रीच्या वेळी दोन संशयित व्यक्ती फिरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. हा प्रकार मंगळवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास घडला.
बैठ्या वस्तीत हातात लाकडी व लोखंडी दांडके घेतलेले, अंगावर रेनकोट घातलेले हे दोघे चोरटे बिनधास्त फिरताना दिसले. त्यांच्या हातात टॉर्च होता आणि परिसरात ते टॉर्चच्या उजेडात शोधाशोध करत होते. या दरम्यान परिसरातील एका रहिवाशी पहाटे लवकर गेल्यास चोरट्यांनी त्याला हटकल्याचं त्याने सांगितलं. मात्र पकडलं जाण्याची भीती वाटताच हे चोरटे तिथून पळून गेले.
Ambernath: नालेसफाईची तक्रार केल्याचा राग, भाजपा पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण; VIDEO व्हायरलत्यामुळे या दोघांचा हेतू नेमका काय होता? ते फक्त रात्रभर गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या अविर्भावात लोकांना दिशाभूल करण्यासाठी फिरत होते का? की प्रत्यक्षात चोरी करण्याचा डाव होता? असा प्रश्न आता स्थानिकांमध्ये चर्चेत आला आहे.चड्डी बॉडी गँग सारख्या टोळ्या चर्चेत असताना आता या नव्या प्रकारची चर्चा होत आहे.
Ambernath : लिफ्टमध्ये एकटा दिसला, बिल्डिंगमधील व्यक्तीचा 12 वर्षीय मुलावर हल्ला; हातालाही चावला, अंबरनाथमध्ये खळबळ VIDEOया परिसरात यापूर्वीही लहान-मोठ्या चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागलं असून फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.