वडगाव मावळ, ता.१७ : ॲड. पु. वा. परांजपे विद्यामंदिर शाळेतील पर्यवेक्षिका रेखा भेगडे यांना गुणवंत शिक्षिका या राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले. कोल्हापूर येथील अविष्कार फाउंडेशनने भेगडे यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कामाची दखल घेऊन हा पुरस्कार दिला. सोलापूर येथील निर्मलकुमार फडकुले सभागृहात सहाय्यक पोलिस आयुक्त दीपक आर्वे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. लेखक सचिन वायकुळे, फाउंडेशनचे अध्यक्ष संजय पवार, जब्बार शिकलगार, ए. बी. शेख, स्मिता केदार आदींसह संघटनेचे पदाधिकारी व पुरस्कार्थींचे नातेवाईक उपस्थित होते.