जळगावमध्ये ढगफुटीसदृश झालेल्या पावसामुळे १० गावे प्रभावित
Webdunia Marathi September 18, 2025 02:45 PM

महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील दहा गावे ढगफुटीसारखी परिस्थितीमुळे बाधित झाली आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले की, सुमारे ४५२ घरे पाण्याखाली गेली आहे. शेतकऱ्यांच्या सुमारे २,५०० हेक्टर शेती जमिनीचे नुकसान झाले आहे. या आपत्तीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तसेच गुरेढोरे आणि इतर प्राण्यांचाही मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) बाधित कुटुंबांना अन्न पुरवठा करत आहे.

ALSO READ: लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा!अपात्र महिलांना लाभ मिळत असल्याचा सुप्रिया सुळेंचा दावा

तसेच काही भागात वीजपुरवठा पूर्ववत झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी बाधित भागांना भेट दिल्यानंतर सांगितले की, दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील चार तहसील गंभीरपणे प्रभावित झाले आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील पिके नष्ट झाली आहेतआणि अनेक घरात पाणी शिरले आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना त्वरित सर्वेक्षण करण्याचे आणि पीडितांना पुरेशी भरपाई देण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहे.

ALSO READ: जया शेट्टी हत्या प्रकरणात गँगस्टर छोटा राजनला मोठा धक्का, जामीन रद्द

Edited By- Dhanashri Naik

ALSO READ: मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे चार जणांचा बळी तर अनेक राज्यांमध्येअलर्ट जारी


© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.