सीबीएसईने बोर्डाने नुकताच त्यांच्या परीक्षांसंदर्भात काही जुन्या नियमात मोठे बदल केली आहेत. यंदाच्या वर्षी सीबीएसई बोर्डाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे नियम अत्यंत महत्वाचे आहेत. अन्यथा विद्यार्थ्यांनी याचे पालन केले नाही तर त्यांना परीक्षेत बसण्याची साधी परवानगी देखील दिली जाणार नाहीये. बोर्डाने स्पष्ट म्हटले आहे की, अंतर्गत मूल्यांकन आता बोर्ड परीक्षेचा भाग आहे. जर विद्यार्थी शाळेत उपस्थित राहिले नाहीत तर त्यांचे अंतर्गत मूल्यांकन प्रक्रिया केली जाणार नाही फक्त हेच नाही तर बोर्ड त्यांचा निकाल देखील राखून ठेवले. आता विद्यार्थ्यांसाठी ही धक्कादायक बातमी नक्कीच म्हणावी लागेल.
सीबीएसईने हे नवीन शिक्षण धोरण लागू केलंय. एखादा विद्यार्थी जर शाळेत गेलाच नाही आणि त्याने परीक्षेत बसण्यासाठी फ्रॉर्म भरला असेल तर अत्यावश्यक पुनरावृत्ती श्रेणीत त्याला ठेवले जाईल हेच नाही तर त्याला पुढच्या वर्षी पुन्हा परीक्षा द्यावी लागेल आणि त्याने दिलेल्या परीक्षाचे निकालही राखीव ठेवला जाईल. दहावीत पाच विषय अनिवार्य आहेत आणि दोन अतिरिक्त विषयांना परवानगी आहे. बारावीच्या वर्गात फक्त एक अतिरिक्त विषयाला परवानगी असेल. असेही नुकताच बोर्डाने स्पष्ट केले.
हेच नाही तर हे दोन विषय दोन वर्षातील अभ्यासक्रमातीलच पाहिजेत. याचा अर्थ स्पष्ट असा होतो की, दहावीसाठी अतिरिक्त विषय नववीत ठरवावे लागतील आणि बारावीसाठी अतिरिक्त विषय अकरावीतच निवडावे लागतील. सीबीएसई बोर्ड परीक्षांतील काही नियम आणि कायदे लागू केले आहेत. सीबीएसई बोर्ड परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना हे नियम माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. जर या नवीन नियमांचे पालक विद्यार्थ्यांनी केले नाही तर त्यांना मोठा फटका बसू शकतो.
प्राइवेट स्टूडेंट्सला परीक्षा देण्यासाठी कोणत्याही शाळेशी संलग्न असण्याची अजिबात आवश्यकता नाहीये. ते आपण आपला अभ्यास करून परीक्षा आरामात देऊ शकतात. शाळांमध्ये प्रयोगशाळा किंवा सुविधा नाहीत त्या शाळा अतिरिक्त विषय देऊ शकत नाहीत हे देखील बोर्डाने त्यांच्या नियमात म्हटले आहे.