इन्फोटेक सॉफ्टवेअर कंपनीच्या योगदानाचे गडकरींकडून कौतुक
esakal September 19, 2025 07:45 AM

पुणे, ता. १५ : इन्फोटेक सॉफ्टवेअर ॲण्ड सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेड (आय-टेक) या देशातील अग्रगण्य आरएफआयडी आणि माहिती तंत्रज्ञान सोल्यूशन्स कंपनीच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त पुण्यातील मुख्यालयात भव्य कार्यक्रम नुकताच झाला. या वेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी प्रमुख पाहुणे, तर माजी लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे (निवृत्त) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

गेल्या २५ वर्षांत कंपनीने फास्टटॅग क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावली असून, देशातील प्रत्येकी दुसऱ्या वाहनासाठी फास्ट टॅग उपलब्ध करून दिला आहे. तसेच आरएफआयडी -सक्षम कंटेनर ई-सील्समुळे १०५ बंदरे आणि इनलँड कंटेनर डेपोवरील निर्यात व्यवहार सुरक्षित झाले आहेत. रिटेल, वेअरहाउसिंग, लॉजिस्टिक्स, ऑइल अँड गॅस यांसारख्या क्षेत्रात कंपनीच्या उपाययोजनांनी कार्यक्षमतेत क्रांती घडवली आहे.
या समारंभात गडकरी यांनी आरएफआयडी आणि फास्टटॅगमुळे झालेल्या वेळ, इंधन बचतीबरोबरच महसूलवाढीचा उल्लेख करत कंपनीच्या योगदानाचे कौतुक केले. यावेळी त्यांनी पांचजन्य अनुभव केंद्राचे उद्घाटन केले. जनरल पांडे यांनी कंपनीच्या प्रगतीला स्वदेशी तंत्रज्ञान नेतृत्वाचे उत्तम उदाहरण असल्याचे नमूद केले.
कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अशिम पाटील यांनी आगामी काळात ‘गरुडा व्हिजिल’ या नव्या आरएफआयडी प्लॅटफॉर्मसह जागतिक विस्तार आणि रोखे बाजारात प्रवेश करण्याची घोषणा केली. अध्यक्षा अवंतिका पाटील यांनी विकसित भारत २०४७ च्या ध्येयात योगदान देण्याची कंपनीची बांधिलकी व्यक्त केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.