ःनिकम विद्यालयात हिंदी दिनानिमित्त कार्यक्रम
esakal September 19, 2025 12:45 PM

निकम विद्यालयात हिंदी दिनानिमित्त कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. १८ : हिंदी दिनानिमित्त सावर्डे येथील गोविंदराव निकम माध्यमिक विद्यालयात आयोजित कार्यक्रमात गौरी शितोळे, प्रेरणा कदम, अमित साळवी यांनी तयार केलेल्या भित्तिपत्रकाचे उद्घाटन उपप्राचार्य विजय चव्हाण यांच्या हस्ते झाले. या वेळी सिद्धी इंगळे, समर्थ मेने, श्रावणी राठोड व अनघा कांबळे यांनी हिंदी भाषेविषयी माहिती दिली.
हिंदी पंधरवड्यात कविता पाठांतर, कहानी लेखन-वाचन, निबंध लेखन व भाषण स्पर्धांसारख्या उपक्रमांचे आयोजन विद्यालयातर्फे करण्यात आले असून, विद्यार्थिनींनी सादर केलेले समूहगीत विशेष आकर्षण ठरले. पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रात सहाय्यक शिक्षक अमित साळवी यांनी हिंदी दिनाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे निवेदन विद्यार्थिनी कोमल सावंतने केले. आभार विद्यार्थिनी सलोनी खांबेने मानले. या वेळी प्राचार्य राजेंद्र वारे, दिशा विचारे, समृद्धी कदम, ज्ञानेश्वर भुवड, शिक्षक व विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.