नाशिकमध्ये डेंग्यू रुग्णसंख्या 400 पार, सप्टेंबरच्या 17 दिवसांत 464 नवे रुग्ण
तर ऑगस्ट अखेर एकूण रुग्णसंख्या 424 होती
मलेरियासह चिकनगुनियाचेही 49 रुग्ण आढळले, तर मलेरियाचे 21 रुग्ण नोंदले गेले
महापालिकेचा ठेकेदारास 1 लाख 10 हजारांचा दंड
आरोग्य विभागाकडून डास निर्मूलनासाठी सतर्क असल्याचा दावा
मात्र वाढती रुग्णसंख्या पाहता आरोग्य विभागाच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह
Sunil Tatkare : 'राष्ट्रवादीची ताकद विदर्भात वाढली’ : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेनागपूर : विदर्भातील विधानसभेच्या निवडणुकीत सातपैकी सहा आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे विदर्भातही आमची ताकद वाढली आहे. यामुळेच शिबिरासाठी विदर्भाची निवड करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली.
Mahesh Rakh : पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार महेश राखचा खून करून संशयितांचे मिरजेकडे पलायनकोल्हापूर : पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार महेश राख याचा खून करून मुख्य संशयित आदित्य गवळी, सद्दाम कुंडले, धीरज शर्मा या तिघांनी मिरजेकडे पलायन केले होते. मिरज रेल्वे जंक्शनवर दुचाकी लावून पळून जाण्याचा त्यांचा विचार होता; पण तिघेही पुन्हा कोल्हापुरात परतले. पोलिसांनी त्यांच्या या दुचाकी जप्त केल्या.
Chhagan Bhujbal : जरांगेंना मदत करणाऱ्यांना धडा शिकविणार; समता परिषदेच्या मेळाव्यात भुजबळ यांचा इशारानागपूर : ‘‘शपथपत्राच्या आधारे जातीचा निर्णय कुठेही मान्य नाही. ते कायदा-संविधानाच्या विरोधात आहे. निवडणूक आली की मनोज जरांगे आंदोलन करायला उभे राहतात. त्यांना राजकारणातीलच काही लोक मदतही करतात,’’ असा आरोप करून ओबीसी नेते व अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगेंना मदत करणाऱ्यांना ओबीसी धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दिला. फडणवीस हे राज्यातील ओबीसींसाठी आशेचा किरण असल्याचे सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले.
Ambabai Temple : अंबाबाई देवीच्या दागिन्यांना झळाळी, पोलिस अधीक्षकांची मंदिर परिसराला भेट; सुरक्षिततेबाबत सूचनाकोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात जय्यत तयारी सुरू असून, आज गुरुवारी देवीच्या नित्य व उत्सव काळातील सोन्याच्या दागिन्यांची स्वच्छ्ता करण्यात आली. उद्या शुक्रवारी देवीच्या मौल्यवान चांदीच्या दागिन्यांची स्वच्छता करण्यात येणार आहे. दिवसभर देवीच्या सोन्याच्या दागिन्यांची स्वच्छता केल्याने दागिन्यांना नव्याने झळाळी मिळाली. दरम्यान, आज देवीच्या सुवर्ण पालखीचीही स्वच्छता पूर्ण झाली.
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाला अमेरिकेतील फेडरल न्यायालयाचा दणकावॉशिंग्टन : अमेरिकेत एकटे आलेल्या ग्वाटेमालाच्या स्थलांतरित मुलांना तत्काळ त्यांच्या मातृदेशात परत पाठविण्याच्या निर्णयाला अमेरिकेतील फेडरल न्यायालयाने स्थगिती दिली आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाला हा धक्का मानला जात असून, त्यांच्या स्थलांतर धोरणाला विरोध म्हणून हे पाऊल उचलण्यात आल्याचे म्हटले जाते. न्यायाधीश टिमोथी जे. केली यांनी हा निर्णय दिला आहे. सरकारी आश्रयस्थाने आणि विविध ठिकाणी राहत असलेल्या ग्वाटेमालाच्या स्थलांतरित मुलांना परत पाठविण्याच्या ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.
Mysore Dasara Festival : म्हैसूर दसरोत्सव उद्घाटन वाद सर्वोच्च न्यायालयात; आज सुनावणीबंगळूर : म्हैसूर दसरा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी बुकर पारितोषिक विजेत्या आणि कन्नड लेखिका बानू मुश्ताक यांना आमंत्रित करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला कायम ठेवणाऱ्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे.
Anil Ambani : उद्योजक अनिल अंबानींविरोधात 'सीबीआय'चे आरोपपत्रमुंबई : येस बँकेतील २ हजार ७९६ कोटी रुपयांच्या अफरातफरप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) उद्योजक अनिल अंबानी आणि बँकेचे माजी सीईओ राणा कपूर यांच्याविरुद्ध विशेष न्यायालयात आरोपपत्र सादर केले.
Maratha Reservation : मराठा आरक्षणाविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळलीLatest Marathi Live Updates 19 September 2025 : मतदारयाद्यांमधील अनियमिततेवरून सातत्याने आरोप करणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज कर्नाटकमधील आळंद मतदारसंघात केंद्रीकृत पद्धतीने कॉल सेंटर आणि सॉफ्टवेअरचा वापर करून ६०१८ मतदारांची नावे हटविण्यात आल्याचा दावा केला आहे. मतचोरी करणारे आणि लोकशाहीची हत्या करणाऱ्यांना निवडणूक आयुक्त पाठीशी घालत असल्याचा घणाघात त्यांनी केला. तसेच मराठा समाजाला इतर मागासवर्ग प्रवर्गात (ओबीसी) आरक्षण मिळण्याबाबत राज्य सरकारने दोन सप्टेंबरला काढलेल्या शासन निर्णयाला (जीआर) आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेवर सुनावणी घेण्यास गुरुवारी (ता. १८) उच्च न्यायालयाने नकार दिला आणि याचिका फेटाळून लावली. अमेरिकेत एकटे आलेल्या ग्वाटेमालाच्या स्थलांतरित मुलांना तत्काळ त्यांच्या मातृदेशात परत पाठविण्याच्या निर्णयाला अमेरिकेतील फेडरल न्यायालयाने स्थगिती दिली आहे. येस बँकेतील २ हजार ७९६ कोटी रुपयांच्या अफरातफरप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) उद्योजक अनिल अंबानी आणि बँकेचे माजी सीईओ राणा कपूर यांच्याविरुद्ध विशेष न्यायालयात आरोपपत्र सादर केले. निवडणूक आयोग कर्नाटकमध्ये २३ वर्षांत पहिल्यांदाच मतदार यादीत २५ सप्टेंबरपर्यंत मतदार यादीचे विशेष संघन पुनरीक्षण (एसआयआर) करणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..