तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत खांब हायस्कूलने मिळविले उज्ज्वल यश
esakal September 19, 2025 09:45 PM

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत खांब हायस्कूलचे यश
रोहा, ता.१८ (बातमीदार) ः तालुका पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या वतीने सुतारवाडी हायस्कूल येथे पावसाळी तालुकास्तरीय खो-खो स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेत रा. ग. पोटफोडे विद्यालय खांब यांनी यश संपादित केले आहे.
या स्पर्धेत पोटफोडे विद्यालयातील १४ वर्षे वयोगट मुलींच्या खो-खो संघाने एमपीएसएस या संघाला अंतिम सामन्यात पराभूत करून विजेतेपद पटकावले. तर १७ वर्षे वयोगटात विरजोली हायस्कूलच्या मुलींच्या संघाने अंतिम सामन्यात पोटफोडे विद्यालयाचा पराभव केल्याने पोटफोडे विद्यालयास उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
या स्पर्धेतील यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष महेंद्र पोटफोडे व सर्व संचालक मंडळ आणि मुख्याध्यापक सुरेश जंगम व सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी अभिनंदन व्यक्त करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

फोटो कॅप्शन :
खो-खो स्पर्धेत गुणवंत विद्यार्थ्यांना चषक देऊन गौरविण्यात आले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.