Share Market Closing : सेन्सेक्स 388 अंकांनी कोसळून बंद, गुंतवणूकदारांचे 1.34 लाख कोटी रुपये नुकसान
मुंबई : भारतीय शेअर बाजार आज १९ सप्टेंबर रोजी घसरणीसह बंद झाले. सलग तीन दिवसांच्या वाढीनंतर, गुंतवणूकदारांनी उच्च पातळीवर नफा बुक करण्यास सुरुवात केली. आयटी, ऑटो आणि एफएमसीजी समभागांमध्ये सर्वाधिक विक्री दिसून आली. शिवाय, अमेरिकेने इराणच्या चाबहार बंदरासाठी भारताला देण्यात आलेल्या निर्बंध सूट मागे घेण्याची घोषणा केली. याचा बाजारातील भावनेवरही परिणाम झाला. व्यवहार संपताच, सेन्सेक्स ३८७.७३ अंकांनी कोसळून ८२,६२६.२३ वर बंद झाला. तर निफ्टी ९६.५५ अंकांनी घसरून २५,३२७.०५ वर बंद झाला.
आयटी, एफएमसीजी, खाजगी बँक आणि ग्राहकोपयोगी वस्तू निर्देशांक १% पर्यंत घसरले. बँक निफ्टी ०.५६% ने घसरून ५५,४११.५५ वर बंद झाला. दुसरीकडे, फार्मा, पीएसयू बँक आणि तेल-वायू निर्देशांक १.२% पर्यंत वाढून बंद जाले. निफ्टी मिडकॅप १०० निर्देशांक ०.०७% वाढला. निफ्टी स्मॉलकॅप १०० निर्देशांक ०.०८% च्या किरकोळ वाढीसह बंद झाला.
बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज, १९ सप्टेंबर रोजी वाढून ४६६.४९ लाख कोटी रुपये झाले. ते मागील दिवशी गुरुवार, १८ सप्टेंबर रोजी ४६५.७३ लाख कोटी रुपये होते. बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल आज अंदाजे १.३४ लाख कोटींनी वाढले. दुसऱ्या शब्दांत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १.३४ लाख कोटींनी वाढ झाली.
सेन्सेक्समधील ३० पैकी अकरा समभाग वाढीसह बंद झाले. अदानी पोर्ट्समध्ये सर्वाधिक १.०९% वाढ झाली. यानंतर, भारती एअरटेल, स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), एशियन पेंट्स आणि एनटीपीसीचे समभाग ०.५५% ते १.०५% पर्यंत वाढीसह बंद झाले.
सेन्सेक्सचे उर्वरित १९ समभाग घसरून बंद झाले. यामध्येही एचसीएल टेक १.७६ टक्क्यांनी सर्वाधिक घसरून सर्वाधिक घसरला. दुसरीकडे, आयसीआयसीआय बँक, टायटन, ट्रेंट आणि कोटक महिंद्रा बँकेचे शेअर्स ०.१६ टक्के ते १.३२ टक्क्यांपर्यंत घसरले.