अदानी पॉवर करणार Stock Split, 1 शेअरचे 5 शेअर्समध्ये विभाजन, पुढील आठवड्यात रेकाॅर्ड तारीख
ET Marathi September 19, 2025 10:45 PM
मुंबई : अदानी समूहाची वीज कंपनी अदानी पॉवर पहिल्यांदाच आपल्या शेअर्सचे विभाजन म्हणजेच स्टॉक स्प्लिट करत आहे. अदानी पॉवर एका शेअरचे पाच शेअर्समध्ये विभाजन करणार आहे. म्हणजेच Adani Power चा प्रत्येकी १० रुपये दर्शनी मूल्याचा एक शेअर प्रत्येकी २ रुपये दर्शनी मूल्यासह पाच शेअर्समध्ये विभाजित होईल. या stock split ची रेकाॅर्ड तारीख पुढील आठवड्यात आहे. शुक्रवार १९ सप्टेंबर रोजी अदानी पॉवरचे शेअर्स ८% पेक्षा जास्त वाढून ६८६.९५ रुपयांवर पोहोचले.



आज शेवटची संधी


Adani Power च्या स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड तारीख सोमवार, २२ सप्टेंबर २०२५ आहे. या stock split चा फायदा घेऊ इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आज शेवटची संधी आहे.गुंतवणूकदारांनी आज शुक्रवारी अदानी पॉवरचे शेअर्स खरेदी केले तर त्यांना स्टॉक स्प्लिटचा फायदा होईल. प्रमोटर्सकडे अदानी पॉवरमध्ये ७४.९६% हिस्सा आहे. तर सार्वजनिक शेअरहोल्डिंग २५.०४% आहे.



शेअर्सचा परतावा


गेल्या पाच वर्षांत अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये १,७१५% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. शेअर्स १८ सप्टेंबर २०२० रोजी ३७.४० रुपयांवर होता. आता १९ सप्टेंबर २०२५ रोजी शेअर्स ६८६.९५ रुपयांवर पोहोचला. गेल्या चार वर्षांत अदानी पॉवरच्या शेअर्सने ५७५%, दोन वर्षांत ८०% परतावा दिला आहे. तर गेल्या सहा महिन्यांत शेअर्समध्ये जवळपास ३३% वाढ झाली आहे. शेअर्सचा ५२ आठवड्यांचा नीचांक ४३२ रुपये आहे. तर ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी ६८६.९५ रुपये आहे.



© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.