Maharashtra Politics: ठाणे जिल्ह्यात भाजपला खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शरद पवार गटात प्रवेश
esakal September 20, 2025 02:45 AM

भिवंडी : भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार बाळ्या मामा यांच्या मार्गदर्शनाने व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हा समन्वयक संतोष शिंदे यांच्या प्रयत्नाने शहापूर तालुक्यातील खर्डी, शिरोळ, शेणवा, कोठारे, साकडबाव, किन्हवली, जिल्हा परिषद गटातील भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी गुरुवारी खा.बाळ्या मामा यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटात जाहीर प्रवेश केला. कार्यकर्त्यांच्या या पक्ष प्रवेशाने शहापूर तालुक्यात भाजपला खिंडार पडली असून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची ताकद वाढली आहे.

भाजपचे उप तालुकाध्यक्ष जयवंत बोडके,भाजपा बिरवाडी गटाचे विभाग अध्यक्ष अनिस शेख, भाजप आदिवासी सेल खर्डी विभाग अध्यक्ष नाना निखडे,माजी पंचायत समिती सदस्य काशिनाथ वाख यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी खा.बाळ्या मामा यांच्या उपस्थितीत मानकोली येथील कार्यालयात गुरुवारी राष्ट्रवादी शरद पवार गटात जाहीर प्रवेश केला.

Navi Mumbai Municipality: नवी मुंबई पालिकेची भरती स्थगित, निकाल जाहीर न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गट महिला जिल्हाध्यक्ष डॉ.रुपाली कराळे,उपजिल्हाध्यक्ष सोनूकाका पडवळ,जैष्ठ कार्यकर्ते दत्तु दिनकर,शहापूर तालुकाध्यक्ष नंदकुमार मोगरे, शहापूर तालुका महिलाध्यक्षा कमलताई भोईर, शहराध्यक्ष विक्रांत शिंदे, युवाध्यक्ष अविनाश साबळे यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आगीमी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्ष ताकदीनिशी उभा राहत असून कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठी आदरणीय शरद पवारांच्या दुरदृष्टी नेतृत्वावर विश्वास ठेवत आहे. भाजपकार्यकर्त्यांनी आज जाहीर पक्ष प्रवेश केल्याने शहापूर तालुक्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची ताकद वाढली असून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा झेंडा निश्चितच फडकेल असा विश्वास यावेळी खासदार बाळ्या मामा यांनी व्यक्त केला.

Digital Panvel: ‘डिजिटल पनवेल’साठी पहिले पाऊल! महापालिका कार्यालयात किओस्क यंत्रणेचा वापर
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.