एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका डॉक्टरने प्रेमिकेसोबत नको ते कृत्य केले आहे. त्याने प्रथम तीन इंजेक्शन देऊन तिला बेशुद्ध केले. त्यानंतर तिच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर धारदार शस्त्राने अनेक खोल जखमा केल्या. त्यानंतर त्या युवतीला निर्वस्त्र करून दिल्ली-लखनऊ हायवेवर फेकून दिले. ज्या युवतीसोबत डॉक्टरने हे क्रूर कृत्य केले, ती त्याची प्रेयसी असल्याचे सांगितले जाते.
नेमकं काय घडलं?
डॉक्टरला वाटले होते की हायवेवर कोणतेही वाहन त्या युवतीला चिरडेल आणि तिचा मृत्यू हा रस्ता अपघात समजला जाईल, परंतु युवतीच्या नशिबात जीवन होते. त्यामुळे गावकऱ्यांचे लक्ष तिच्यावर गेले. युवती रक्तबंबाळ अवस्थेत होती. गावकऱ्यांनी तिला पाहिल्यावर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. युवतीला ओढणीने गुंडाळून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर युवतीच्या जबाबावरून पोलिसांनी डॉक्टरची चौकशी केली. सुरुवातीला डॉक्टरने पोलिसांना सांगितले की, तो त्या युवतीला ओळखत नाही. परंतु पोलिसांनी त्याच्या मोबाइलच्या कॉल डिटेल्स दाखवल्यावर तो घाबरला. त्यानंतर डॉक्टरने युवतीसोबत प्रेमसंबंध असल्याची कबुली दिली.
वाचा: हे काय स्वप्न नाही बरं का; गुलिगत सूरज चव्हाणचं ठरलं लग्न, तिच्यासोबतचा खास फोटो
पोलिसांच्या चौकशीत डॉक्टरने सांगितले की, त्याला युवतीपासून सुटका करून घ्यायची होती. म्हणून त्याने तिच्यावर अत्याचार केले. माहितीनुसार, ही युवती बदायूं येथील रहिवासी आहे. पाच वर्षांपूर्वी तिने बरेलीच्या मेडिकल कॉलेजमधून नर्सिंगचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर बीसलपूर रोडवरील एका खासगी रुग्णालयात तिला नोकरी मिळाली. तिथेच तिची ओळख बीएएमएस डॉक्टरशी झाली. त्यानंतर दोघांमध्ये प्रेम झाले.
युवतीला लग्नाचे आमिष दाखवले
डॉक्टरने युवतीला लग्न करू असे आमिष दाखवले. परंतु नंतर तिला कळले की तो विवाहित आहे. त्यानंतर डॉक्टर आणि युवती यांच्यात भांडणे सुरू झाली. मंगळवारी युवतीने डॉक्टरला सांगितले की, तिच्या पोटात दुखत आहे. त्यावर डॉक्टरने उपचाराच्या बहाण्याने तिच्या घरी जाऊन तीन इंजेक्शन देऊन तिला बेशुद्ध केले. त्यानंतर तिच्या चेहऱ्यावर, डोक्यावर आणि शरीरावर धारदार शस्त्राने जखमा केल्या. त्यानंतर डॉक्टरने युवतीला कारच्या पुढील सीटवर झोपवून ड्रिपही लावली. मग मध्यरात्री 12 वाजता इन्व्हर्टिस युनिव्हर्सिटीजवळ हायवेच्या कडेला तिला निर्वस्त्र करून फेकून दिले. त्याचा हेतू होता की कोणतेही वाहन त्या युवतीला चिरडेल, ज्यामुळे तिचा मृत्यू होईल आणि तो अपघात वाटेल. एसएसपी अनुराग आर्य यांनी सांगितले की, डॉक्टरची चौकशी सुरू आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल.