DUSU Election Result : प्रतिष्ठेच्या निवडणुकीत 'ABVP'ने मारली बाजी; काँग्रेसच्या 'NSUI'ला जोरदार झटका...
Sarkarnama September 20, 2025 01:45 PM

Student Politics in Delhi University Gains Momentum : देशातील दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी संघाची निवडणूक प्रतिष्ठेची मानली जाते. या संघावर वर्चस्व राखण्यासाठी भाजप, काँग्रेससह इतर राजकीय पक्षांच्या विद्यार्थी संघटनांकडून ताकद पणाला लावली जाते. दिल्लीमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर दिल्ली विद्यापीठाची निवडणुकीतही चुरस निर्माण झाली होती. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाशी संबंधित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने बाजी मारली आहे.

विद्यार्थी संघाच्यानिवडणुकीसाठी गुरूवारी झालेल्या मतदानामध्ये 39.45 टक्के विद्यार्थ्यांनी मतदान केले होते. या निवडणुकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि संयुक्त सचिव या चार प्रमुख पदांसाठी एबीव्हीपी आणि एनएसयूआयमध्ये काँटे की टक्कर होते. त्यामध्ये एबीव्हीपीला उपाध्यक्षपद सोडता उर्वरित तिन्ही पदांवर विजय मिळाला आहे.

अध्यक्षपदावर एबीव्हीपीचे आर्यन मान, सचिवपदी कुणाल चौधरी आणि संयुक्त सचिव पदावर दीपिका झा यांचा विजय झाला आहे. तर गोविंद तंवर यांना उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. या पदावर एनएसयूचे राहुल झांसल विजयी झाले आहे. सुरूवातीच्या फेऱ्यांमध्ये सर्व चार पदांवर एबीव्हीपीचे उमेदवार आघाडीवर होते. पण उपाध्यक्षपदासाठी चुरस पाहायला मिळाली. यामध्ये झांसल यांनी बाजी मारली.

ZP Election update : ZP निवडणुकीचा मार्ग मोकळा; झिरो आरक्षणाविरोधातील याचिकेवर कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल

गतवर्षीच्या निवडणुकीड एनएसयूआयने अध्यक्ष आणि संयुक्त सचिव या दोन पदांवर कब्जा केला होता. रौनक खत्री अध्यक्ष तर लोकेश चौधरी संयुक्त सचिव बनले होते. त्यावेळी एबीव्हीपीला उपाध्यक्ष आणि सचिवपद मिळाले होते. जवळपास सात वर्षांनंतर गतवर्षी एबीव्हीपीला अध्यक्षपद गमवावे लागले होते. यंदा मात्र पुन्हा एकदा एबीव्हीपीन या पदावर कब्जा करत आपली ताकद दाखवून दिली.

Bihar Politics : पहिल्याच निवडणुकीत लालूंचा पराभव, नितीश कुमार ठरले जायंट किलर!

दणदणीत विजय

एबीव्हीपीच्या तिन्ही उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला आहे. आर्यन मान यांना 28 हजार 841 मते मिळाली आहेत. त्यांनी जोललिन चौधरी यांचा सुमारे 16 हजार मतांनी पराभव केला आहे. सचिव पदाच्या निवडणुकीत कुणाल चौधरी यांनीही दणदणीत विजय मिळवला. त्यांना 23 हजार 779 मते मिळाली. तर संयुक्त सचिवपदाच्या निवडणुकीत दीपिका झा यांना 21 हजार 825 मते मिळाली. या दोघांचा अनुक्रमे सात हजार आणि चार हजार मतांनी विजय मिळवला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.