- rat१८p१२.jpg-
२५N९२३३५
सावर्डे ः कृषी विभागाच्यावतीने भातपिकावरील कीडरोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) प्रशिक्षण कार्यक्रमात बोलताना प्राचार्य संकेत कदम.
------
मांडकी-पालवण येथे
कीडरोग सर्वेक्षण प्रशिक्षण
सावर्डा, ता. १९ : कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेच्या गोविंदराव निकम कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवण येथे कृषी विभागाच्यावतीने भातपिकावरील कीडरोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) प्रशिक्षण झाले. या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश पिकांवर येणाऱ्या कीडरोगांचा अभ्यास करून, त्याच्या नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हा होता.
प्रशिक्षणावेळी बाळासाहेब सूर्यवंशी यांनी पिकांवरील विविध रोग आणि त्यांच्या नियंत्रणाचे उपाय यावर सखोल माहिती दिली. डॉ. पांडुरंग मोहिते यांनी कीड नियंत्रण कसे करावे, याचे सादरीकरण केले. त्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन कीड आणि रोगांचे नमुने दाखवून उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना प्रात्यक्षिक मार्गदर्शन केले. दत्तात्रय गीते यांनी क्रॉपसॅपअंतर्गत निरीक्षणे कशी घ्यावीत याबद्दल माहिती दिली. उपविभागीय कृषी अधिकारी शिवाजीराव शिंदे यांनी कर्मचाऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले. या वेळी डॉ. संकेत कदम यांनी विद्यापीठातील नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचले पाहिजे, यावर भर दिला.
---