Mental Health Awareness: मनोविकारांबाबत जनजागृतीचा अभाव! उपचारासाठी लवकर निदान गरजेचे; मनोविकारतज्ज्ञांची चिंता
esakal September 20, 2025 04:45 PM

Lack of Awareness About Mental Disorders Raises Concern Among Specialists: विविध कारणांमुळे मानसिक आजारांचे प्रमाण वाढत आहे. मात्र, सध्याच्या एकविसाव्या शतकातही मानसिक आरोग्याबद्दल पुरेशी जागरूकता नाही. मानसिक आरोग्यविषयक मदत उपलब्ध करून देण्यात कलंक आणि जागरूकतेचा अभाव हे सर्वांत मोठे अडथळे असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. इतर आजारांप्रमाणेच अधिक चांगल्या उपचारासाठी मानसिक आजाराचे लवकर निदान होण्याचे महत्त्वही मनोविकारतज्ज्ञांनी अधोरेखित केले.

मानसिक आरोग्यविषयक तक्रारी असणाऱ्यांना 'इमोनीड्स' या संस्थेच्या माध्यमातून मदत करणाऱ्या संस्थेच्या संस्थापक आणि मानसोपचारतज्ज्ञ डॉ. नीरजा अग्रवाल म्हणाल्या, की स्वतःला मानसिक आजार असल्याचे मान्य करण्यात लोक कचरतात. खरे तर मानसिक आजारांवर इतर कोणत्याही आजारांप्रमाणेच उपचार करण्याची गरज असून त्याकडे व्यक्तिमत्त्व दोष म्हणून पाहता कामा नये, हे ओळखणे

महत्त्वाचे आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह या आजारांसाठी जसे दीर्घकाळ किंवा आयुष्यभर उपचार घ्यावे लागतात, त्याचप्रमाणे स्किझोफ्रेनिया किंवा बायपोलार डिसऑर्डरसारख्या मानसिक आजारांवरही आयुष्यभर उपचार घ्यावे लागू शकतात.

Facial Surgery Success Story: "सुसाईड डिसीज"वर यशस्वी शस्त्रक्रिया - ठाण्यात दोन रुग्णांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

दिल्लीतील सीताराम भरतीया रुग्णालयातील डॉ. जितेंद्र जाखर म्हणाले, मनोविकारतज्ज्ञ रुग्णावर उपचार न केल्याचा कालावधीही विचारात घेतात. याचाच अर्थ जितका अधिक काळ तो उपचाराविना राहिला असेल, तितका अधिक वेळ त्याला बरे होण्यासाठी लागू शकतो. ज्याप्रमाणे मधुमेहावर उपचार न केल्यास तो इतर अवयवांवर परिणाम घडवू शकतो, त्याचप्रमाणे स्किझोफ्रेनिया, नैराश्य, चिंताविकारासारख्या मानसिक आजारांवर उपचार न केल्यास व्यक्तीचा मेंद, भावना व दैनंदिन आयुष्यावर विपरीत परिणाम होतो.

'एम्स' दिल्लीतील डॉ. दीपिका दहिमा म्हणाल्या, भारतात मानसिक आरोग्याभोवतीचा कलंक एखाद्या मूक साथीसारखा कायम आहे. आजही अनेक कुटुंबांमध्ये मानसोपचारतज्ज्ञांकडून केल्या जाणाऱ्या निदानाकडे कौटुंबिक व सामाजिक प्रतिष्ठेला असलेला धोका म्हणून पाहिले जाते. त्यामुळे विवाह जमणेही अवघड मानले जाते.

Breast Cancer Recurrance Reduction: ब्रेस्ट कॅन्सर पुन्हा होण्याचा धोका कमी करण्यासाठी अवलंबा हे ५ अत्यंत महत्त्वाचे उपाय

मानसिक आजार ओळखून लवकर उपचार केल्यास रुग्ण लवकर प्रतिसाद देतात. आपल्या देशात पूर्वपिक्षा अधिक चांगले उपचार उपलब्ध आहेत, आता गरज असेल तर ती संबंधित व्यक्ती व समाजाच्या स्वीकाराची. आपल्याला मानसिक आरोग्यविषयक साक्षरतेची गरज आहे. ज्याप्रमाणे, हृद्यविकार किंवा पक्षाघाताची लक्षणे लोक ओळखतात, त्याप्रमाणे, नैराश्य, चिंताविकारासह इतर मानसिक आजारांची लक्षणे ओळखण्यासाठी लोकांना साक्षर करायला हवे.

- डॉ. जितेंद्र जाखर, मनोविकारतज्ज्ञ

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.