Local Megablock: तीन दिवस विशेष ब्लॉक! लाेकल, मेल-एक्स्प्रेसवर परिणाम, वेळापत्रकात बदल; पाहा कधी आणि कोणत्या मार्गावर?
esakal September 20, 2025 04:45 PM

मुंबई : मध्य रेल्वेच्या कर्जत यार्ड रिमॉडेलिंग कामासाठी २२, २३ आणि २४ सप्टेंबरला विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात कर्जत ते खोपोली-नेरळ मार्गावरील सर्व उपनगरी सेवा पूर्णपणे ठप्प राहणार आहेत. त्याचबरोबर काही मेल-एक्स्प्रेस गाड्यांचे वेळापत्रक बदलले जाईल, तर काही गाड्या वळविण्यात येणार आहेत.

या कामांमुळे प्रवाशांना गैरसोय होणार असली तरी कर्जत यार्डचे आधुनिकीकरण आणि गाड्यांची वहनक्षमता वाढविण्यासाठी हे ब्लॉक आवश्यक असल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे. प्रवाशांनी पर्यायी व्यवस्था करून सहकार्य करावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

Maharashtra Politics: ठाणे जिल्ह्यात भाजपला खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शरद पवार गटात प्रवेश २२ सप्टेंबर (दुपारी १२.२५ ते १.५५)
  • ब्लॉक कालावधीत कर्जत-खोपोलीदरम्यान गाड्या धावणार नाहीत.

  • सीएसएमटी ते खोपोली गाडी कर्जत येथेच थांबवणार, तर दुपारी ४.३०ची खोपोली ते सीएसएमटी गाडी कर्जत येथूनच सुटेल.

२३ सप्टेंबर (सकाळी ११.२० ते दुपारी १.५०)
  • नेरळ-खोपोली सेवा बंद राहणार आहे.

  • कोइम्बतूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस व पुणे-दिल्ली दुरांतो एक्स्प्रेस कर्जत ते पनवेलमार्गे वळविण्यात येणार आहेत.

  • सीएसएमटी-कर्जत गाड्यांची सेवा नेरळ येथेच समाप्त हाेईल, तर कर्जत-सीएसएमटी आणि ठाणे गाड्या नेरळहूनच सुटतील.

Maharashtra Rain: पुढील तीन दिवस महत्त्वाचे! मुसळधारेसह भरतीचा इशारा; हवामान विभागाचा 'या' जिल्ह्यांना अलर्ट २४ सप्टेंबर (सकाळी ११.२० ते दुपारी ३.२०)
  • टप्प्याटप्प्याने ब्लॉकघेण्यात येईल. या काळात कोइम्बतूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस लोणावळा येथे नियंत्रित केली जाईल.

  • चेन्नई-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस व चेन्नई-एलटीटी सुपरफास्ट पुणे विभागात नियंत्रित होतील. नेरळ-खोपोली मार्गावरील उपनगरीय सेवा बंद राहील.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.