Gold and Silver Rate Today : गेल्या दोन दिवसांपासून सोने आणि चांदीत घसरण सुरु होती. तर आज 19 सप्टेंबर 2025 रोजी सोन्यात चमक दिसली. वायदे बाजारात (MCX) सोन्याचा भाव 421 रुपयांनी उसळला. हा भाव 1 लाख 9 हजार 473 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचला आहे. त्यासह एमसीएक्सवर चांदी 1644 रुपयांनी म्हणजे 1.3 टक्क्यांची उसळी घेतली. एक किलो चांदीचा भाव 1,28,755 रुपयांवर व्यापार करत आहे. त्यानंतर चांदी तिच्या सर्वकालीन उच्चांकावर 1,30,284 रुपये प्रति किलोवर पोहचली आहे.
तर सोने खरेदीदार 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याची दागदागिने खरेदी करतात. एक दिवसापूर्वी 18 सप्टेंबर रोजी 24 कॅरेट सोने रुपयांवर विक्री होत होते. तर 17 सप्टेंबर रोजी सोने 220 रुपयांनी स्वस्त झाले होते. 1,11,710 रुपये प्रती 10 ग्रॅम असा दोन दिवसांपूर्वी भाव होता. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 18 सप्टेंबर रोजी 500 रुपयांनी घसरून 1,01,900 रुपयांवर आला. तर 17 सप्टेंबर रोजी त्यात 200 रुपयांची घसरण झाली होती. दोन दिवसांपूर्वी हा दर 1,02,400 रुपये इतकी होती.
सोन्याची किंमत किती?
goodreturns.in नुसार, 18 सप्टेंबर रोजी 1 ग्रॅम 24 कॅरेट सोने 54 रुपयांनी घसरले आता सोन्याचा भाव 11,117 रुपये होता. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 10,190 रुपये होता. तर 18 कॅरेट 1 ग्रॅम सोन्याचा भाव 8,338 रुपये इतके होता. तर आज सोने वधारले आहे. 1 ग्रॅम सोने 16 रुपयांनी वाढले आहे. आता 24 कॅरेट सोने 11,148 रुपये तर 22 कॅरेट सोने 10,220 रुपये इतके आहे.
चांदी 2000 वधारली
17 सप्टेंबर रोजी 2000 रुपयांची घसरण झाली. तर 18 सप्टेंबर रोजी चांदी 2000 रुपयांनी उतरली होती. आज सकाळी चांदीत 2 हजारांची वाढ दिसून आली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 1,33,000 रुपये इतका आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) सोने आणि चांदीचा भाव वधारला आहे. 24 कॅरेट सोने 1,10,170 रुपये, 23 कॅरेट 1,09,730, 22 कॅरेट सोने 1,00,910 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 82,630 रुपये, 14 कॅरेट सोने 64,450 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 1,27,100 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.