जिल्हा कुस्ती स्पर्धेत यश शिंदे प्रथम
esakal September 20, 2025 03:45 PM

-ratchl१९१.jpg-
२५N९२६०२
चिपळूण ः यश शिंदे यांचे अभिनंदन करताना पदाधिकारी.

जिल्हा कुस्ती स्पर्धेत यश शिंदे प्रथम
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १९ ः क्रीडा व युवक सेवा संचनालय, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय आणि जिल्हा कुस्ती असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या. या चिपळूण तालुक्यातील पेढे येथील आर. सी. काळे कॉलेजमधील यश शिंदे यांनी १९ वर्षांखालील स्पर्धेत ८६ किलो वजनगटात जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. त्याची कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या गटात तो रत्नागिरी जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे. त्याला महाविद्यालयाचे क्रीडाशिक्षक अमरजीत मस्के यांचे मार्गदर्शन मिळाले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अभय सहस्रबुद्धे, चिटणीस सुनील गमरे, प्राचार्य विनायक माळी, पर्यवेक्षिका विशाखा माळी यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व ग्रामस्थांनी यशचे अभिनंदन करत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.