अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारताला कोंडीत पकडण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबताना दिसत आहेत. सर्वात पहिला धक्का म्हणजे भारतावर 50 टक्के टॅरिफ, दुसरा धक्का म्हणजे चाबहार बंदर भारताच्या हातून काढले आणि आता तिसरा धक्का म्हणजे H-1B व्हिसाबद्दल घेतलेला धक्कादायक निर्णय. अमेरिकेने H-1B व्हिसावरील फीस थेट वाढून टाकली असून साधारणपणे 83 लाख रूपये लावण्यात आली. H-1B व्हिसावरच भारतीय नागरिक हे अमेरिकेत नोकऱ्या करतात. या नवीन नियमामुळे अनेक जण अडचणीत सापडल्याचे बघायला मिळत आहेत. डोनाल्ड ट्रम्प सरकारने लावलेला हा निर्णय 21 सप्टेंबर 2025 च्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता अमेरिकन कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना थेट अलर्ट पाठवलाय.
डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे भारतीय नोकरदार वर्ग अडचणीत सापडला. कारण H-1B व्हिसा सर्वात जास्त भारतीय नागरिकांकडेच आहे. इमिग्रेशन अटॉर्जी आणि टेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना मोठा इशारा देत लगेचच अमेरिकेत परत येण्याच्या सूचना दिल्या आहेत. नाही तर त्यांना अमेरिकेत येण्यापासून रोखले जाईल किंवा ते फसतील. सोशल मीडियावर सध्या मायक्रोसॉफ्ट कंपनीचा एक मेल तूफान व्हायरल होताना दिसत आहे.
ज्यामध्ये त्यांनी आपल्या कंपनीत काम करणाऱ्या H-1B व्हिसा धारकांना अमेरिकेत लगेचच परतण्यास सांगितले. हेच नाही तर अमेरिकेतच राहण्याचा सल्ला दिलाय. सध्या H-1B व्हिसा धारक हे मोठ्या संख्येने सुट्टीवर अमेरिकेच्या बाहेर आहेत. मात्र, त्यांना तात्काळ अमेरिका गाठण्यास सांगितले असून अमेरिकेतच राहा, असे स्पष्ट सांगण्यात आले. डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या H-1B व्हिसाच्या निर्णयामुळे टेक कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांची नोकरी धोक्यात आहे.
H-1B व्हिसाबाबत घेतलेल्या निर्णयानंतर आता डोनाल्ड ट्रम्प हे भारताला धक्का देण्यासाठी अजून काय धक्कादायक निर्णय घेतात, याकडे संपूर्ण जगाच्या नजरा असल्याचे बघायला मिळत आहे. मात्र, एकीकडे भारताच्या विरोधात डोनाल्ड ट्रम्प हे निर्णय घेताना दिसत आहेत तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताबद्दलच्या संबंधांबाबत चांगली विधाने करत आहेत. यामध्येही डोनाल्ड ट्रम्प यांची दुटप्पी भूमिका जगापुढे आली आहे.