पंचायतराज अभियानाबाबत मुणगे ग्रामसभेमध्ये जागृती
esakal September 20, 2025 01:45 PM

92508

पंचायतराज अभियानाबाबत
मुणगे ग्रामसभेमध्ये जागृती
मुणगे, ता. १९ ः येथील ग्रामपंचायत कार्यालयात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान निमित्त विशेष ग्रामसभेचे आयोजन सरपंच अंजली सावंत यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच केले होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मार्गदर्शन केलेला कार्यक्रम ग्रामपंचायतीमध्ये दाखविण्यात आला.
उपसरपंच दशरथ मुणगेकर, ग्रामपंचायत अधिकारी साहिल लोणारे, ग्राम महसूल अधिकारी सुभाष नाडे, संपर्क अधिकारी डॉ. प्रवीण राणे, पशुसंवर्धन अधिकारी मिठबांव, ग्रामपंचायत सदस्य साक्षी गुरव, प्रमोद सावंत, विश्वास मुणगेकर, पोलिसपाटील साक्षी सावंत, पोलिसपाटील तुषार आडकर, गोविंद सावंत, अंगणवाडी सेविका दीपाली पुजारे, दीपिका बागवे, शिल्पा राऊळ, सौ. धुवाळी, आरोग्य सेविका जोशी, एकता ग्रामसंघ कोषाध्यक्ष हर्षदा मुणगेकर, सचिव आरती सावंत, सीआरपी सायली बागवे, संजना मुणगेकर, विद्या सावंत, अनुजा कारेकर, सुनील सावंत, संदीप आचरेकर, सत्यवान बागवे, सुचित्रा मुणगेकर, अरुण पेडणेकर, विजय पडवळ, पुरषोत्तम तेली आदी ग्रामस्थ उपस्थित होते. मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. पंचायतराज अभियानाबाबत माहिती लोणारे यांनी दिली. ग्राममहसूल अधिकारी नाडे यांनी मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.