रस्त्यातील अडथळे,अतिक्रमण दूर करा, नोव्हेंबर अखेरपर्यंत खड्डे मुक्त करा असे आदेश महापालिका आयुक्त यांनी प्रशासनाला दिले. पण त्याचवेळी दुसरीकडे पोलिसांतर्फे शहरातील तब्बल ५५० किलोमीटरचे रस्ते सीसीटीव्हीची केबल टाकण्यासाठी खोदण्यात येणार आहे. याची सुरुवात नवी पेठेतील राजेंद्रनगरमधून झाली आहे. त्यामुळे पुणे खड्डे मुक्त कसे होणार? असा प्रश्न उपस्थित झाला असून, महापालिकाही संभ्रमित झाली आहे.
AKOLA : 'अकोल्यात बच्चू कडू आणि रविकांत तुपकरांची वादग्रस्त विधानंअकोल्यात 'किसान ब्रिगेड'च्या वतीने 'शेतकरी लूट वापसी संवाद सभा' पार पडलीय. ही सभा गाजलीय ती 'प्रहार'चे नेते बच्चू कडू आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या वादग्रस्त विधानांनी... या सभेसाठी देश आणि राज्यातील शेतकरी नेते अकोल्यात आले होतेय. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत, बच्चू कडू, रविकांत तूपकर, प्रकाश पोहरे, अजित नवले, विश्वास उटगी आदी नेते या सभेला उपस्थित होतेय.
या सभेत बोलताना 'प्रहार'चे नेते बच्चू कडू यांनी त्यांच्या नुकत्याच झालेल्या जळगाव येथील आंदोलनानंतर दाखल झालेल्या गुन्ह्यांचा उल्लेख केलाय. जळगावातील आंदोलनात आम्ही फक्त जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट तोडलंंय. यानंतर राज्यात होणाऱ्या आंदोलनात आम्ही आता थेट कलेक्टरलाच तोडू, असा वादग्रस्त इशारा बच्चू कडू यांनी दिलाय.
PUNE : उद्धव ठाकरे यांचा ४ ऑक्टोबर रोजी पुणे दौराउद्धव ठाकरे यांचा ४ ऑक्टोबर रोजी पुणे दौरा
शिवसैनिकांना उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन
आगामी महापालिका निवडणुकीची पायभरणीला होणार सुरुवात
स्थानिक स्वराज्य निवडणुकीची तयारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन, पक्ष संघटना मजबूत करणे याविषयी उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन
एक दिवसीय मार्गदर्शनाला पुणे शहरातील सर्व पदाधिकारी, शिवसैनिक राहणार उपस्थितीत
बालगंधर्व रंग मंदिर या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन होण्याची शक्यता
Heavy Rain: राज्यात विजांसह पावसाचा अंदाज कायमRain Alert: आज (ता. २०) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
आमदार रोहित पवार जामखेडमध्ये संतापले, नेमकं काय झालं?अहिल्यानगर : अनेकदा राज्य आणि देश पातळीवरील विविध विषयांवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करणारे आमदार रोहित पवार आज त्यांच्या मतदारसंघात अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापलेले दिसले. जामखेडमध्ये आमसभा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये नागरिकांनी नगरपालिकेच्या कामाबद्दल सर्वाधिक तक्रारी केल्या. यावर अधिकारी मोघम उत्तरे देत असल्याचे पाहून आमदार पवार संतापले. "आतापर्यंत गोट्या खेळत होतात का?" अशा शब्दात अधिकाऱ्यांना फटकारले.
नगरपरिषद संदर्भात जामखेड शहरातील नागरिकांनी सर्वात जास्त तक्रारी आमसभेत आमदार रोहित पवार यांच्यासमोर मांडल्या... नगरपरिषद सीईओ यांच्यावर नागरिकांनी कामात केलेली अफरातफर, शहरातील कचरा उचलण्यासाठी देण्यात आलेले कंत्राट... कचरा उचलण्यात होणारी टाळाटाळ, शहरातील चिखलमय रस्ते, गटारी, सांडपाण्याची विल्हेवाट, मोकाट जनावरे, मोकाट कुत्रे, तुंबलेल्या गटारी, अनियमित सुटलेले पाणी, मच्छरांचा होणारा उपद्रव आदी विषयावर आमदार रोहित पवार यांनी नागरिकांच्या प्रश्नावर अधिकाऱ्यांना धारेवर धरलं...