प्रसिद्ध गायक जुबिन गर्ग यांचा सिंगापूरमध्ये स्कुबा डायव्हिंगवेळी अपघातात मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह आज भारतात आणण्यात येणार असल्याची माहिती समजते. आसामचे मुख्यमंत्री हिंमत बिस्वा सरमा यांनी शुक्रवारी सांगितलं की, सिंगापूरच्या भारतातील उच्चायुक्तांनी सांगितलं की, जुबिन गर्ग यांचा मृत्यू लाइफ जॅकेटशिवाय समुद्रात उतरल्यानं झाला. गर्ग यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन शनिवारी होणार आहे. त्यानंतर सायंकाळी भारतात मृतदेह आणला जाईल.
मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा म्हणाले की, गर्ग लाइफ जॅकेट न घालता पोहण्यासाठी गेले होते. लाइफ गार्डने त्यांना जॅकेट घाला असं सांगितलं होतं पण गर्ग यांनी नकार दिला होता. गर्ग यांच्यासह १८ जण स्कुबा डायव्हिंगसाठी गेले होते. गर्ग हे समुद्रात तरंगताना बेशुद्धावस्थेत आढळले होते. दरम्यान, स्कुबा डायव्हिंगसाठी खोल समुद्रात जाण्याआधीचा त्यांचा शेवटचा व्हिडीओ आता समोर आला आहे. यात ते लाइफ जॅकेट घालून पोहोण्याचा आनंद घेत असल्याचं दिसतंय.
उच्चायुक्तांनी मुख्यमंत्री हिमंत बिस्व सर्मा यांना सांगितलं की, गर्ग यांच्यासोबत जे होते त्यांची यादी पाठवण्यात आलीय. यात सिंगापूरमध्ये राहणारे आसाममधील ११ जण होते. यात अभिमन्यू तलुकदार यांनी बोट बूक केली होती. तर याशिवाय गर्ग यांच्या टीममधील चौघे आणि बोटीच्या क्रूचा समावेश होता.
भारतीयांचं अमेरिकेत जाणं महागणार; H1 व्हिसा हवा असेल तर द्यावे लागणार ९० लाख; ट्रम्प यांचा निर्णयगर्ग हे समुद्रात तरंगताना आढळून आले होते. त्यांना बेशुद्धावस्थेत बाहेर काढण्यात आलं. तात्काळ लाइफ गार्डने सीपीआर दिला आणि तिथून रुग्णालयात हलवण्यात आलं. पण रुग्णालयात त्यांना मृत घोषित केलं गेलं. आता गर्ग यांच्यासोबत असणाऱ्या लोकांची चौकशी केली जात आहे.
२००२ मध्ये अपघातातून वाचले
जुबीन गर्ग यांच्या अकाली निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. याआधी २३ वर्षांपूर्वी जुबीन गर्ग एका अपघातातून वाचले होते. पण या अपघाता त्यांच्या बहिणीचा मृत्यू झाला होता. गर्ग यांची बहिण जोंगकी बरठाकूर ही तेव्हा फक्त १८ वर्षांची होती. गर्ग यांच्याप्रमाणेच ती मनोरंजन क्षेत्रात काम करत होती. काही चित्रपटातही तिनं काम केलेलं.