- धनंजय शेटे
भूम - पोतदार इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी सई खामकर हिने राष्ट्रीय पातळीवरील 'रंगोत्सव सेलिब्रेशन' कला स्पर्धेत सुवर्णपदक आणि पारितोषिक मिळवून शाळेचा आणि जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे.
'रंगोत्सव सेलिब्रेशन' ही देशभरातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेली एक प्रतिष्ठित कला स्पर्धा आहे. या स्पर्धेत अनेक राज्यांतून हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या सर्व स्पर्धकांमध्ये सईने आपल्या उत्कृष्ट कलेचे प्रदर्शन करत अव्वल स्थान पटकावले.
सई खामकरच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. तिच्या कलाशिक्षकांनी घेतलेले परिश्रम आणि सई ची मेहनत यामुळेच हे यश शक्य झाले. या यशाबद्दल बोलताना शाळेच्या सर्व शिक्षकांनी सईचे कौतुक केले आणि तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सईला मिळालेल्या या सुवर्णपदकामुळे आता तिची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठीही निवड झाली आहे. सई खामकर हिच्या या दैदिप्यमान यशाबद्दल विविध स्तरातून तिचे अभिनंदन करण्यात आले असून तिच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. व तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.