Raju Shetti : शेतकरी घाम गाळतात अन् मलिदा मात्र कारखानदार खातात : माजी खासदार राजू शेट्टी; अपेक्षित ऊसदर अजूनही मिळाला नाही
esakal September 21, 2025 12:45 AM

भीमानगर : काही वर्षांपासून राज्यात उसाचे उत्पादन विक्रमी होत आहे. मात्र संघटित साखर कारखानदारांमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित ऊसदर अजूनही मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी कायम तोट्यातच राहिला. साखर कारखानदार नेहमीच ऊसदराआडून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करत असून ''शेतकरी घाम गाळतात अन् मलिदा मात्र साखर कारखानदार खातात! असा घणाघात माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला.

Success Story:'विशाल केंजळेंची एमपीएससीमधून यशाला गवसणी'; जिद्दीच्या जाेरावर ११ वेळा सरळसेवा परीक्षेत सुयश, आई-वडिलांचे स्वप्न केलं पूर्ण

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या संकल्पनेतून भीमानगर (ता. माढा) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या हेल्पलाइन कार्यालयाचे उद्घाटन शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी खा. शेट्टी बोलत होते. व्यासपीठावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील, प्रदेश युवक अध्यक्ष अमरसिंह कदम, पोलिस निरीक्षक नारायण पवार, लेबर फेडरेशनचे अध्यक्ष भारत पाटील उपस्थित होते.

माजी खा. शेट्टी म्हणाले, राज्यातील सर्वच साखर कारखानदार एकत्र येऊन खासगी-सहकारी कारखान्यांचे ऊसदर ठरवतात. लोकप्रतिनिधी असणाऱ्या आमदार, खासदारांचेच बहुतांश साखर कारखाने असल्याने ऊस दर कमी मिळतो.

मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस दरासाठी वेळोवेळी राज्यव्यापी आंदोलने उभी केल्याने राज्यातील शेतकऱ्यांना ऊसदर वाढवून मिळाला. स्वतःच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांना लुटणाऱ्या साखर सम्राटांची दुकानदारी संघटनेने मोडीत काढली आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष प्रताप पिसाळ, सरपंच परिषदेचे राज्य कार्यकारणी सदस्य बाळासाहेब ढेकणे, औंदुबर महाडिक, सुरेश पाटील, जिल्हा युवक अध्यक्ष विजय रणदिवे आदी उपस्थित होते.

Smart Meter: मीटरचा हिशोब ‘स्मार्ट’ की फसवा?; वाढीव वीजबिलांमुळे ग्राहक संतप्त, दुरुस्तीसाठी महावितरण कार्यालयात रांगा हेल्पलाइचा शेतकऱ्यांना फायदा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या हेल्पलाइन कार्यालयामुळे शेतकऱ्यांना निश्चित फायदा होईल असे प्रतिपादन खा.शेट्टी यांनी यावेळी केले. यावेळी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे राज्य कार्यकारणी सदस्य बाळासाहेब ढेकणे व शिराळ (टें) ग्रामस्थांच्यावतीने दहा हजार रुपयांची मदत खा.शेट्टी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.