अमूल मिल्क न्यूज: अमूलने दुग्धजन्य पदार्थांच्या किंमती कमी केल्या आहेत. जीएसटी स्लॅबमध्ये बदल केल्यानंतर, कंपन्या आता थेट ग्राहकांना फायदा देत आहेत. अमूल ब्रँड अंतर्गत दुग्धजन्य पदार्थांचे मार्केटिंग करणाऱ्या जीसीएमएमएफने शनिवारी तूप, बटर, आईस्क्रीम, बेकरी आणि फ्रोझन स्नॅक्ससह 700 हून अधिक उत्पादनांच्या पॅकच्या किरकोळ किमती कमी केल्या आहेत. किंमती कमी केल्याने दुग्धजन्य पदार्थांचा, विशेषतः आईस्क्रीम, चीज आणि बटरचा वापर वाढेल. कारण भारतात या उत्पादनांचा दरडोई वापर खूपच कमी असल्याचे अमूलने म्हटलं आहे.
नवीन किंमती 22 सप्टेंबरपासून लागू होतील. गुजरात सहकारी दूध विपणन महासंघाने (जीसीएमएमएफ) 700हून अधिक उत्पादनांच्या पॅकवरील किमती कमी करण्याची घोषणा केली, ज्यामुळे ग्राहकांना जीएसटी कपातीचा पूर्ण फायदा मिळेल. ही सुधारणा 22 सप्टेंबर 2025पासून लागू होईल. ही सुधारणा बटर, तूप, यूएचटी दूध, आईस्क्रीम, चीज, चॉकलेट, बेकरी उत्पादने, फ्रोझन डेअरी आणि बटाटा स्नॅक्स, कंडेन्स्ड मिल्क, पीनट स्प्रेड, माल्ट-आधारित पेये यासारख्या उत्पादन श्रेणींमध्ये करण्यात आली आहे. निवेदनानुसार, बटरची (100 ग्रॅम) कमाल किरकोळ किंमत 62रुपयांवरून 58 रुपये करण्यात आली आहे. तर तुपाची किंमत 40 रुपयांनी कमी करून 610 रुपये प्रति लिटर करण्यात आली आहे.
अमूल प्रोसेस्ड चीज ब्लॉकची (एक किलो) कमाल किरकोळ किंमत 30 रुपयांनी कमी करून 545रुपये प्रति किलो करण्यात आली आहे. फ्रोझन चीजची (200 ग्रॅम) नवीन कमाल किरकोळ किंमत 99 रुपयांवरून 95 रुपये होईल. किंमती कमी केल्याने दुग्धजन्य पदार्थांचा, विशेषतः आइस्क्रीम, चीज आणि बटरचा वापर वाढेल, कारण भारतात त्यांचा दरडोई वापर अजूनही खूपच कमी आहे, असे अमूलचा विश्वास आहे.” यापूर्वी, मदर डेअरीने 22 सप्टेंबरपासून त्यांच्या उत्पादनांच्या किमती कमी करण्याची घोषणा केली होती.
आणखी वाचा