H-1B व्हिसा फी वाढीनंतर तातडीनं अमेरिकेत पोहोचण्याचे आदेश, USA च्या अधिकाऱ्याकडून गुड न्यूज…
Marathi September 21, 2025 02:25 AM

न्यूयॉर्क: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसाची वार्षिक फी 1लाख अमेरिकन डॉलर केली आहे. यानंतर अमेरिकेतील भारतीय आयटी कर्मचारी आणि कंपन्यांमध्ये मधील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. काही मोठ्या टेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना तातडीनं अमेरिकेत परतण्याचा सल्ला दिला होता. मायक्रोसॉफ्टनं त्यांच्या H-1B व्हिसाधारक कर्मचाऱ्यांना 21 सप्टेंबरपूर्वी दाखल होण्यास सांगितलं होतं.मात्र, एका अमेरिकन अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार H-1B व्हिसाधारक भारतीयांनी घाबरण्याची गरज नसल्याचं म्हटलंय.

अमेरिकेचे अधिकाऱ्यानं शनिवारी म्हटलं की, H-1B व्हिसाधारक भारतीयांना रविवारीपर्यंत अमेरिकेत परतण्याची गरज नाही. त्यांना अमेरिकेत परत येण्यासाठी 1 लाख डॉलर भरावे लागणार नाहीत. अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की ट्रम्प सरकारचा नवा नियम केवळ नव्यानं होणाऱ्या व्हिसा अर्जांसाठी असेल. ज्या लोकांकडे पहिल्यापासून H-1B व्हिसा आहे ते व्हिसाचं नुतनीकरण करत आहेत. त्यांच्यावर नवी फी लागू राहणार नाही.

भारतीयांवर सर्वाधिक परिणाम

अमेरिकेतील H-1B व्हिसाधारकांमध्ये सर्वाधिक परिणाम भारतीय कर्मचाऱ्यांवर होणार आहे. कारण, H-1B व्हिसाधारकांमध्ये 70 टक्के भारतीय आहेत. यामुळं टेक कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना तातडीनं अमेरिकेत दाखल होण्यासाठी सांगितलं आहे.

कंपन्या काळजीत, थोडासा दिलासा

मायक्रोसॉफ्ट, अमेझॉन आणि जेपी मॉर्गन या सारख्या दिग्गज कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना अमेरिकेला परतण्याचा इशारा दिला होता. मात्र, अमेरिकेच्या अधिकाऱ्याच्या स्पष्टीकरणानंतर भारतीय कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.

कंपन्यांकडून इशारा

व्हिसा फी वाढीच्या बातमीनंतर मायक्रोसॉफ्ट, अमेझॉन आणि जेपी मॉर्गन यासारख्या मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना सल्ला दिला होता. या कंपन्यांनी जे कर्मचारी अमेरिकेबाहेर आहेत त्यांनी तातडीनं परत यावं असं सांगितलं होतं. जे H-1B व्हिसाधारक सध्या अमेरिकेत आहेत, त्यांनी आंतरराष्ट्रीय प्रवास टाळावा, असं सांगण्यात आलं होतं. सध्याची H-1B व्हिसाची फी 1000 अमेरिकन डॉलर्स ते 5000 डॉलर्स दरम्यान आहे. मात्र, नवं धोरण लागू झाल्यानंतर ती फी  1 लाख डॉलर होईल.  या निर्णयानंतर सर्वाधिक परिणाम भारतीय आयटी कर्मचाऱ्यांवर होऊ शकतो. कारण, H-1B व्हिसाधारकांमध्ये 70 टक्के भारतीय कर्मचारी आहेत.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.