आशिया कप स्पर्धेतून बाद झाल्यानंतर अफगाणिस्तान संघात उलथापालथ, यादीत दिग्गज खेळाडूंचा समावेश
GH News September 21, 2025 06:13 PM

आशिया कप स्पर्धेपूर्वी अंतिम फेरीसाठी अफगाणिस्तान संघाचं नाव आवर्जून घेतलं जात होतं. पण या स्पर्धेतील साखळी फेरीतच अफगाणिस्तानला बाद होण्याची वेळ आली. अफगाणिस्तानने तीन पैकी फक्त एकाच सामन्यात विजय मिळवला. त्यामुळे सुपर 4 फेरीचं गणित चुकलं आणि स्पर्धेतून आऊट झाले. त्यामुळे अफगाणिस्तानचं आशिया कप स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याचं स्वप्न भंगलं आहे. अफगाणिस्तान संघ स्पर्धेतून बाद झाल्यानंतर क्रिकेट बोर्डाने पुढची तयारी सुरु केली असून मोठी घोषणा केली आहे. अफगाणिस्तानचा संघ बांगलादेशविरुद्ध व्हाइट बॉल क्रिकेट मालिका खेळणार आहे. यासाठी संघाची घोषणा केली आहे.आशिया कप स्पर्धेत मनासारखी कामगिरी झाली नाही. पण त्यातून सावरून आता पुन्हा एकदा मैदानात नव्या जोशात उतरण्याची तयारी केली आहे. ही मालिका संयुक्त अरब अमीरात म्हणजेच युएईत खेळवली जाणार आहे. यात तीन टी20 आणि तीन वनडे सामन्यांचा समावेश आहे.

अफगाणिस्तानचा संघ पुढच्या वर्षी भारतात होणाऱ्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेची तयारी या माध्यमातून सुरु करणार आहे. अफगाणिस्तानचा संघ मोठे उलटफेर करण्यासाठी गृहीत धरला जातो. असंच काहीसं या स्पर्धेतही करण्याची शक्यता आहे. त्यामुळे अफगाणिस्तानला कमी लेखणं बलाढ्य संघांना महागात पडू शकतं. अफगाणिस्तान बांग्लादेश यांच्यातील टी20 मालिका 2 ऑक्टोबरपासून, वनडे मालिका 8 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या मालिकेसाठी वेगवान गोलंदाज फजलहक फारुकी, अष्टपैलू गुलबदिन नैब आणि करीम जॉनत यांना बसवलं आहे. तर राशिद खानला फक्त टी20 संघात स्थान दिलं असून कर्णधारपद भूषवणार आहे. तर वनडे मालिकेत कर्णधारपदाची धुरा हशमतुल्लाह शाहिदीकडे असेल.

बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी अफगाणिस्तानचा संघ

टी20 मालिकेसाठी संघ: राशिद खान (कर्णधार), इब्राहिम जादरान (उपकर्णधार, रहमनुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), मोहम्मद इशाक (विकेटकीपर), सदीकुल्लाह अटल, वफियुल्लाह ताराखिल, दरवेश रासूली, अजमतुल्लाह उमरजई, मोहम्मद नबी, शरफुद्दीन अशरफ, नूर अहमद, मजीब उल रहमान, बशीर अहमद, फरीद अहमद मलिक, अब्दुल्ला अहमदजई.

वनडे मालिकेसाठी संघ: हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), रहमत शाह (उपकर्णधार), रहमनुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), इकराम अलिखिल (विकेटकीपर), इब्राहिम जादरान, सदीकुल्लाह अटल, दरवेश रासूली, अजमतुल्लाह उमरजई, मोहम्मद नबी, रशिद खान, नंग्याल खरोती, एएम गजनफर, अब्दुल्ला अहमदजई, बशीर अहमद, मोहम्मद सलीम साफी.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.