22 सप्टेंबरनंतर या वस्तू करा खरेदी; मिळतील अत्यंत स्वस्त, '0' GST चे गिफ्ट!
Tv9 Marathi September 21, 2025 08:45 PM

GST Reforms implement from 22 September : केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांना जीएसटीचे गिफ्ट दिले आहे. 22 सप्टेंबर म्हणजे उद्या, सोमवारपासून या नवीन सुधारणा लागू होतील. त्यामुळे अनेक दैनंदिन वस्तू स्वस्त होतील. खाद्यपदार्थांसह इतर अनेक वस्तू स्वस्त होतील. त्यात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन, कार, दुचाकी, AC, TV सह इतर वस्तूंचा समावेश आहे. जीएसटी कपातीचा ग्राहकांना मोठा फायदा होईल. उद्यापासून ग्राहकांना स्वस्त खरेदीचा आनंद घेता येईल. अनेक कंपन्यांनी तर फेस्टिव्हल ऑफरमध्ये जीएसटी कपात, कंपनीकडून सूट अशी मिळून आता उत्पादनं किती स्वस्त मिळतील याच्या जाहिराती सुद्धा सुरू केल्या आहेत.

जीएसटी परिषदेचा निर्णय

जीएसटी परिषदेने 3 सप्टेंबर रोजी एक मोठा निर्णय घेतला होता. त्यात जीएसटी दरात कपातीचा निर्णय जाहीर झाला. आता देशात केवळ 2 जीएसटी स्लॅब असतील. 5 टक्के आणि 18 टक्के यामध्ये वस्तूंचे वर्गीकरण होईल. 12 आणि 28 टक्क्यांचा स्लॅब बंद करण्यात आला आहे. 12 टक्के स्लॅबमधील अनेक उत्पादनं आता 5 टक्क्यांच्या स्लॅबमध्ये आहेत.

तर 28 टक्के स्लॅबमधील अनेक उत्पादनं 18 टक्के स्लॅबमध्ये ठेवण्यात आली आहेत. तर काही वस्तूंवरील जीएसटी दर शून्य करण्यात आला आहे. याचा अर्थ 22 सप्टेंबरनंतर या वस्तू, उत्पादनांवर शुन्य जीएसटी द्यावा लागेल. म्हणजेच या वस्तूंवर कोणताच जीएसटी द्यावा लागणार नाही. यामुळे अनेक वस्तू खूप स्वस्त होतील.

या वस्तूंवर शून्य जीएसटी

  • पनीर, छेना (अगोदर 5 टक्के जीएसटी)
  • UHT दूध (अगोदर 5 टक्के जीएसटी)
  • पिझ्झा ब्रेड (अगोदर 5 टक्के जीएसटी)
  • खाखरा, चपाती, पोळी (5 टक्के जीएसटी)
  • पराठा, इतर ब्रेड ( 5 टक्के जीएसटी)
  • आरोग्य आणि जीवन विमा (18 टक्के जीएसटी)
  • काही अत्यावश्यक औषधं (पूर्वी वेगवेगळा जीएसटी)
  • मेडिकल ग्रेड ऑक्सिजन (अगोदर 12 टक्के जीएसटी)
  • शार्पनर,क्रेयॉन आणि पेस्टल (यापूर्वी 12 टक्के जीएसटी)
  • कॉपी,नोटीबुक, पेन्सिल, खोडरबर (अगोदर 12 टक्के जीएसटी)

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेने 3 सप्टेंबर रोजी जीएसटी कपातीचा निर्णय जाहीर केला होता. तर 22 सप्टेंबरपासून त्याच्या अंमलबजावणी घोषीत केली होती. त्यानुसार, देशात 5 टक्के आणि 18 टक्के असे 2 जीएसटी स्लॅब असतील. त्याआधारे वस्तूं, उत्पादनं आणि सेवांवर जीएसटी आकारण्यात येईल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.