पुन्हा एकदा एका मोठ्या शक्तिशाली चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे, शक्तिशाली चक्रीवादळ सुपर टाइफून रागासाने चांगलाच वेग पकडला असून, तब्बल 230 किमी प्रति तास वेगानं हे वादळ पुढे सरकत आहे. या वादळामुळे अतिमुसळधार पाऊस आणि पुराचा धोका निर्माण झाला आहे. या वादळामुळे प्रचंड नुकसान होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
फिलिपिन्स आणि तैवानमध्ये चक्रीवादळ रागासाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे, हे चक्रीवादळ तब्बल ताशी 230 किमी प्रति तास वेगानं दक्षिण चीनकडे झेपावलं आहे.हे शक्तिशाली चक्रीवादळ किनाऱ्याला धडकल्यास मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे दक्षिण चीन, फिलिपिन्स आणि तैवानमध्ये अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट देण्यात आला असून, लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
फिलिपिन्सच्या हवामान विभागनं दिलेल्या माहितीनुसार या वादळानं रौद्र रूप धारण केलं आहे. हे चक्रीवादळ मंगळवारपर्यंत बटानेस द्वीपसमूहाला धडकण्याची शक्यता आहे. सुरुवातीला 185 किमी प्रती तास एवढा या चक्रीवादळाचा वेग होता, मात्र त्यानंतर आता या चक्रीवादळाचा वेग वाढला असून, हे चक्रीवादळ प्रतितास तब्बल 230 किमी वेगानं मार्गक्रमण करत आहे.
या रागासा चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा हा उत्तर फिलिपिन्सला बसण्याची शक्यता आहे, रागासा चक्रीवादळाला फिलिपिन्समध्ये नांडो असं स्थानिक नाव देखील देण्यात आलं आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर फिलिपिन्सच्या राष्ट्रपतींकडून सर्व राष्ट्रीय एजन्सींना अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, तसेच नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याच्या आणि अतिमुसळधार पावासामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास देखील सांगण्यात आलं आहे.
अतिमुसळधार पावसाचा इशारा
दरम्यान या चक्रीवादळामुळे फिलिपिन्समध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. प्रचंड प्रमाणात नुकसान होऊ शकतं, पूराच्या पार्श्वभूमीवर आधीच अनेक नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर केल्याची माहिती समोर येत आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट देण्यात आला आहे.