वाशिमच्या मानोरा तालुक्यातील गिरोली येथील 13 वर्षीय अश्विन आमटे हा मुलगा काल सकाळच्या सुमारास पोहण्यासाठी गेला असता गोखी नाल्यातील पुराच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला होता.पहिल्या दिवशी पाण्यात अश्विनची गावकऱ्यांकडून शोध मोहीम सुरू केली होती. अश्विनचा ठावठिकाणा लागत नव्हता. आपत्कालीन शोध बचाव पथकाला पाचारण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या मुलाला मृतदेह शोधून काढण्यास बचाव पथकाला यश आले.
Latur: ओढ्याला आलेल्या पुरात २ जण वाहून गेले,एकाचा मृत्यूलातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातल्या काटेजवळगा परिसरात तुफान पाऊस झालाय, वादळीवारा आणि मेघगर्जनेसह पाऊस झालाय, ओढ्याला आलेल्या पाण्यात 2 जण वाहून गेले, तर एकाचा मृत्यू झालाय ,
Beed: पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे बीडच्या पाटोद्यात जंगी स्वागतबीडच्या पाटोद्यामध्ये राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या जयंतीनिमित्त शिवपुराण कथेचा आयोजन केले होते आणि या कार्यक्रमाच्या समारोपानिमित्त पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे ह्या उपस्थित राहिल्या असून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आला आहे त्यांच्यावरती जेसीबी मधून फुलांची उधळून करत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आहे. मोठा स्वागत पंकजा मुंडे यांचे करण्यात आला असून त्यांच्यावरती जेसीबी मधून फुलांची उधळण करण्यात आली आहे.
पुण्याच्या म्हाडा वसाहतीत गुंडांचा राडापुण्याच्या म्हाडा वसाहतीत गुंडांचा राडा.. हातामध्ये पिस्तूल घेऊन केला नाच..
इरफान शेख असे हातात पिस्टल घेऊन नाचणाऱ्या गुंडाचे नाव..
मी इथला भाई आहे सगळ्यांनी चड्डीत राहायचं कुणी गोंधळ करायचा नाही अशा आरोळी ठोकत इरफान शेख नाचला..
पिस्टल घेऊन नाचणाऱ्या इरफान शेख ला पोलिसांनी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे सह घेतल ताब्यात..
दहशत माजवल्या प्रकरणी आरोपी इरफान शेख याच्या विरोधात वारजे माळवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
काँग्रेस टोले लावून स्वतःचा टाईमपास करीत असतात...-पंकज भोयरकाँग्रेसजवळ बहुमत नसल्यामुळे किंवा आता लोकमत नसल्यामुळे त्यांना टोला लावल्याशिवाय आता दुसरा काहीही पर्याय उरलेला नाही. त्याच्यामुळे ते टोले लावून स्वतःचा टाईमपास करीत असतात.... असा टोला गृहराज्यमंत्री तथा भंडाऱ्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना लगावला. हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधानपदाचे डोहाळे लागल्याची टीका केली होती. यावर पंकज भोयर यांनी प्रत्युत्तर दिले.
Pune : पुण्यात गांजा विक्री करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना अटकपुण्यातील वानवडी परिसरात गांजाची विक्री
गांजा विक्री करणाऱ्या रेकॉर्ड वरील दोन अट्टल गुन्हेगारांना अटक
राम टेकडी इंडस्ट्रियल एरिया मध्ये आरोपी करत होते गांजाची तस्करी
अविनाश श्रीरंग भोंडवे आणि संजय काथे असे अटक केलेल्या आरोपींची नावे
अटक केलेल्या आरोपींकडून ५० हजार किमतीचा गांजा करण्यात आला जप्त
वानवडी पोलिसांची धडक करवाई
Kalyan : नवरात्रौत्सव काळात कल्याणकारांना वाहतूक कोंडीपासून मिळणार दिलासानवरात्रौत्सव काळात कल्याणकारांना वाहतूक कोंडीपासून मिळणार दिलासा
कल्याण शहरामध्ये जड -अवजड वाहनांच्या वाहतुकीला बंदी
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 22 सप्टेंबरपासून पुढील दहा दिवस निर्णय लागू
Jalna : वकील गुणरत्न सदावर्ते धनगर आंदोलक दिपक बोऱ्हाडे यांच्या भेटीसाठी जालन्यात दाखलवकील गुणरत्न सदावर्ते धनगर आंदोलक दिपक बोऱ्हाडे यांच्या भेटीसाठी जालन्यात दाखल...
धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळवण्याच्या मागणीसाठी जालन्यात दिपक बोऱ्हाडे यांच सुरू आहे आमरण उपोषण...
धनगर आंदोलक दिपक बोऱ्हाडे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा पाचवा दिवस....
वकील गुणरत्न सदावर्ते धनगर आंदोलक दिपक बोऱ्हाडे यांच्या भेटीसाठी दाखल झाले असून दोघांमध्ये चर्चा सुरू आहे...
Laxman Hake : भुजबळ यांच्या बीड मेळावा बॅनरवर लक्ष्मण हाकेंना वगळलेभुजबळ यांच्या बीड मेळावा बॅनर वर लक्ष्मण हाकेना वगळले?
लक्ष्मण हाकेंची नेत्यांनी धास्ती घेतलीय का?
बीड जिल्ह्यात उलट सुलट चर्चाना उधाण
लक्ष्मण हाके उपस्थित राहणार का?
ओबीसी आंदोलनात फूट पडलीय का?
ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत महा एल्गार सभा 28 तारखेला होत आहे
पोस्टरवर सर्व नेत्यांचे फोटो, लक्ष्मण हाकेच फोटो पोस्टरवर नाही
Sangola : सांगोल्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अन्नधान्याचे मदतीचे वाटपसांगोला तालुक्यात दोन दिवसांपूर्वी अतिवृष्टी झाली होती. यामध्ये शेतकऱ्यांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे.
कडलास येथे भटक्या विमुक्त जमातीच्या लोकवस्तीमध्ये पाणी शिरल्याने गोरगरीब लोकांचे संसार उघड्यावर आले आहेत.
अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व गरीब कुटुंबाना सांगोल्याचे शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या वतीने पंधरा दिवस पुरेल इतके अन्नधान्य,भाजीपाल्यासह जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Jalna : जालन्यात वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न...जालन्यात वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न...
वकील गुणरत्न सदावर्ते आज धनगर आंदोलक दिपक बोऱ्हाडे यांच्या भेटीसाठी जालना दौऱ्यावर आहेत...
Pune : पुण्यात बैलपोळ्याच्या मिरवणूकीत नृत्यांगणा थिरकल्यातपुण्याच्या ग्रामीण भागात बैलाबाबत कृतज्ञता व्यक्त करत शेतकरी बैलांना सकाळी अंगोळ घालुन गोडधोड नैवद्य देऊन वाजतगाजत मिरवणुक काढतो आता या बैलपोळा मिरवणुकीत भंडाराची उधळण करत डिजेच्या तालावर नृत्यांगना थिरकल्यात यावेळी गावक-यांनीही चांगलाच जल्लोष केल्याचे पहायला मिळाले
Maharashtra Live News Update: मनोज जरांगेंच्या बैठकीत अचानक मधमाशांचा हल्लामनोज जरांगेंच्या बैठकीत अचानक मधमाश्यांचा हल्ला
बैठकीत आलेल्या अनेकांना मधमाश्यांचा चावा
मनोज जरांगेंना तात्काळ समन्वयकांनी बाहेर काढले
बैठकीच्या ठिकाणी गोधळाचे वातावरण
मराठवाड्यातील निवडक समन्वयकांची बैठक त्यांनी बोलावली होती, आज त्यांच्याशी चर्चा करणार होते
Solapur : आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ सोलापुरात पडळकर यांचे कार्यकर्ते रस्त्यावरसोलापुरात अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासमोर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
राज्यभरात गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलनाला प्रतिउत्तर म्हणून पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
‘’शरद पवारांनी ज्यावेळी हातवारे करून देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली त्यावेळी संस्कृतपणा कुठे होता?‘’
‘’पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईचा AI विडिओ बनवून टीका केली ते कुठल्या संस्कृतीला शोभाणारे होते‘’
भाजप आमदार गोपीचंद पडळकर समर्थक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटाला सवाल
Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणीत आठ वर्षीय चिमुकलीने स्वतःच्या अपहरणाचा प्रयत्न हाणून पाडलाकोल्हापूरच्या नांदणीत लहान मुले पळवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गावातील स्वरा शितल देसाई वय आठ वर्षे आपल्या लहान भावासह संध्याकाळी दूध आणायला निघाली होती. त्याचवेळी मागून येणाऱ्या पाच अनोळखी व्यक्तींनी तिचे व भावाचे तोंड दाबून उचलून घेऊन जाण्याचा प्रयत्न करु लागले. यावेळी स्वराने धरलेल्या हाताचा जोरात चावा घेऊन आरडाओरडा सुरू केला. त्यावेळी संबंधित या दोघांनाही सोडून अंधारातून पळ काढला. आवाज ऐकून लोक जमा झाले. तिने घडलेली घटना सांगितली. नंतर लोक संबंधित व्यक्तींचा शोध घेऊ लागले पण अंधाराचा फायदा घेऊन पळाले होते. संबंधित गुन्ह्याची नोंद शिरोळ पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे संबंधित व्यक्तीचा शोध घेत आहेत.
चिमुकले कोपऱ्यात बसून रडले, आई गळ्याला पडून रडली तर आजोबांनाही कंठ दाटून आलाराज्यात सध्या शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे अनेक गावात नेहमी अध्यापनाचे धडे देणाऱ्या शिक्षकांची बदली होत असल्याने विद्यार्थी रडताना दिसत आहेत हिंगोलीत एका शिक्षिकेची बदली झाल्याने संपूर्ण गाव रडल आहे, हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील आसोंदा गावात प्राथमिक शाळेत शिक्षणाचे धडे देणाऱ्या कल्पना वानरे यांची हिंगोली तालुक्यातील पेडगाव जिल्हा परिषद शाळेत बदली झाली सात वर्षापासून मायेचा ओलावा देत शिक्षणाचे धडे देणाऱ्या विद्यार्थ्यांना व पालकांना कल्पना मॅडम यांची बदली झाल्याची बातमी समजताच त्यांनी अक्षरशा टाहो फोडला, चिमुकले महिला आणि गावातील वयोवृद्ध माणसेही धाय मोकळून रडू लागले आपल्या कुटुंबातील कुणीतरी परदेशी कायमचे निघून जावे एवढं दुःख या गावातील चिमुकल्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना झाले होते.
dharashiv : उमरगा तालुक्यातील कसगी गावाजवळ पुलावरून पाणी,वाहतुक विस्कळितधाराशिवच्या उमरगा तालुक्यातील बेनितुरा नदीला आलेल्या पाण्यामुळे लातूर कलबुर्गी रस्त्यावर पाणी आल्याने महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील कसगी गावाजवळ पूल पाण्याखाली गेला.कलबुर्गी आणि धाराशिव जिल्ह्याला जोडणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.दरम्यान या परिस्थितीची ठाकरे गटाचे आमदार प्रविण स्वामी यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी केली.तसेच पोलिसांनी देखील पुल परीसरात बंदोबस्त ठेवला आहे तर नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे व ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी प्रविण स्वामी यांनी केली आहे.
Hingoli : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना काळे झेंडे दाखवणाऱ्या शिवसैनिकांवर गुन्हे दाखलशिवसेनेचे पदाधिकारी वसीम देशमुख यांच्यासह चार ते पाच जणांवर बासंबा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल
वाशिम वरून नांदेडला पूर पाहणी करण्यासाठी कृषी मंत्री दत्ता भरणे जात असताना हिंगोलीतील पूर परिस्थितीची पाहणी का केली नाही म्हणून संतप्त झाले होते शिवसैनिक
अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर दाखवले होते काळे झेंडे
Karjat MNS Andolan : कर्जत येथे मनसेच्या वतीने रस्त्याच्या प्रशासनाचा निषेध म्हणून मनसेचे भीक मागो आंदोलनकर्जत तालुक्यातील कर्जत शहरासह रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याने व रस्त्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने प्रशासनाचा निषेध करत मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांचे नेतृत्वात भीक मागून आंदोलन करण्यात आले आहे. मनसेने भिक मागून आंदोलन करीत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. तात्काळ संबंधित प्रशासनाने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचे इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.
जालन्यात पावसाचा कहर, ढगफुटी सदृश्य पावसामुळे कपाशी पीक जमीनदोस्त.जालन्यात पावसाचा कहर पाहायला मिळतोय. जालन्यातील भाटेपूरी शिवारात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने कपाशी, सोयाबीनसह फळबागा धोक्यात आल्या आहेत. भाटेपूरी येथील शेतकरी राम आटोळे या शेतकऱ्याचं सहा एकर कपाशी पीक पावसामुळे जमीनदोस्त झालंय. यामुळे या शेतकऱ्याला लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसला. शासनाने दिवाळीपूर्वी आर्थिक मदत करावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.
तळोज्यात 17 वर्षीय तरुणीची घरात घुसून हत्या, पोलिसांनी 24 तासांत केली आरोपीला अटकघरात घुसून एका अल्पवयीन मुलीची हत्या करण्यात आली आहे. ही हत्या नात्यातल्याच एका व्यक्तीने केल्याची माहिती आहे. तळोजा फेस-2 मध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 44 वर्षीय मोहम्मद आयुब साहिल याने आपल्याच नात्यातील एका 17 वर्षीय मुलीला भर दुपारी घरात घुसून तिच्यावर चाकूने सपासप वार करून तिचा खून केल्याचं समोर आलं आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
Beed : बीड जिल्ह्यातील सर्वच शहरांमध्ये कचऱ्याचा प्रश्न गंभीर : पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे घेणार आढावाबीड जिल्ह्यातील बहुतांश नगरपालिकांच्या हद्दीमध्ये कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.. मी आज सकाळी येत असताना विविध ठिकाणी ही समस्या निदर्शनास आली गेल्या अनेक दिवसात निवडणुका झालेल्या नाहीत.. त्यामुळे या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असून आता प्रशासकांची एक आढावा बैठक घेणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.. याबरोबरच बीड जिल्ह्यातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न करणार असल्याचे देखील पंकजा मुंडे यांनी म्हटले.
nashik-malegaon-गांजाची तस्करी करणारा अटकेत १५ किलो गांजा जप्तनाशिकच्या मालेगाव तालूक्यातील चाळीसगाव रोडवरील गिगाव फाटा परिसरात मालेगाव तालूका पोलिसांनी छापा टाकत अवैध गांजाची तस्करी करणा-या व्यक्तीला ताब्यात घेत त्याच्या कडून तीन लाख नऊ हजार रुपये किमतीचा १५ किलो ३६१ ग्रॅम गांजा जप्त केलाय.पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचत पोलिसांनी शिंदखेडा येथिल शरद हिरालाल शिंदे याला ताब्यात घेत त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
BULDHANA : ड्रेनेजसाठी खोदलेल्या नालीत पलटी होऊन कारचा अपघातखामगाव शहरात अनेक ठिकाणी ड्रेनेज लाईनचे काम सुरू आहे व त्यासाठी रस्त्याच्या बाजूने सात ते आठ फूट खोल नाली खोदली आहे. मात्र संबंधित कंत्राटदाराने काम करत असताना कुठल्याही सुरक्षा नियमांचे पालन न केल्यामुळे दररोज अपघात घडत असून यात वृद्ध व लहान मुलं जखमी होताना दिसत आहे. रात्री खामगाव शहरातील बोबडे कॉलनी परिसरात शहरातील डॉ. ब्रह्मानंद टाले हे त्यांच्या कार ने जात असताना ड्रेनेजसाठी खोदून ठेवलेल्या नालीत त्यांची कार पलटी होऊन अपघात झाला. यात डॉ.ब्रह्मानंद टाले हे गंभीर जखमी झालेत. वारंवार शहरात ड्रेनेज लाईन साठी खोदून ठेवलेल्या नालीत वृद्ध लहान मुलं पडून अपघात होण्याचे प्रमाण वाढलं आहे. मात्र संबंधित कंत्राटदार कुठल्याही सुरक्षा नियमांचे पालन करत नाहीत त्यामुळे या कंत्राटदारावर कारवाईची मागणी खामगाव शहरातील नागरिक करत आहेत.
Pimpri - Chinchwad, Pune : अजित पवार यांचे सलग दुसऱ्या दिवशी ही पिंपरी चिंचवड शहर दौऱ्यावरअजित पवार सलग दुसऱ्या दिवशी ही पिंपरी चिंचवड शहर दौऱ्यावर आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने अजित पवार यांनी आज देखील भल्या पहाटे आपला पिंपरी चिंचवड शहर दौरा सुरू केला आहे. यावेळी अजित पवार यांनी महा मेट्रच्या कार्यालयात महा मेट्रोच्या पुढील कामकाजा विषयी आढावा बैठक देखिल घेतली आहे. त्यानंतर अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार मिलन या उपक्रमा अंतर्गत शहरातील माजी पदाधिकाऱ्यांचा घरी जाऊन सदिच्छा भेट घेणार आहेत.
nashik-malegaon-गांजाची तस्करी करणारा अटकेत १५ किलो गांजा जप्तनाशिकच्या मालेगाव तालूक्यातील चाळीसगाव रोडवरील गिगाव फाटा परिसरात मालेगाव तालूका पोलिसांनी छापा टाकत अवैध गांजाची तस्करी करणा-या व्यक्तीला ताब्यात घेत त्याच्या कडून तीन लाख नऊ हजार रुपये किमतीचा १५ किलो ३६१ ग्रॅम गांजा जप्त केलाय.पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचत पोलिसांनी शिंदखेडा येथिल शरद हिरालाल शिंदे याला ताब्यात घेत त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
PUNE : आंदेकर टोळीची २७ खाती गोठवली; ५० लाख रुपये पोलिसांच्या हातीआंदेकर टोळीची २७ खाती गोठवली; ५० लाख रुपये पोलिसांच्या हाती
पुण्यातील आयुष कोमकर खून प्रकरणातील तपासात आंदेकर टोळीच्या आर्थिक साम्राज्याचे नवे धागेदोरे समोर आले आहेत.
पोलिसांनी बंडू आंदेकर व सहकाऱ्यांची तब्बल २७ बँक खाती गोठवली असून त्यांत ५० लाख ६६ हजार ९९९ रुपये असल्याचे उघड झाले आहे.
यापूर्वी घरझडतीत कोट्यवधींचा ऐवज जप्त करण्यात आला होता.
आरोपींच्या स्थावर मालमत्तेचीही चौकशी सुरू आहे. दरम्यान, वनराज आंदेकर खुनाच्या बदल्यासाठी टोळीने आंबेगाव पठार परिसरात रेकी केल्याचे उघड झाले असून संबंधित तपास भारती विद्यापीठ पोलिसांकडे आहे
Maharashtra Rain: राज्यात विजांसह पावसाचा इशारामेघगर्जनेसह पाऊस
रायगड, रत्नागिरी, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव.
हलक्या ते मध्यम सरी
मुंबई,पालघर, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, कोल्हापूर, सातारा, सांगली
PUNE : मेट्रो प्रवाशांना दिलासा... महापालिका पार्किंगसाठी देणार २० जागा...मेट्रोसेवा पूर्ण क्षमतेने सुरू झालेली असली तरी प्रवाशांना पार्किंगसाठी स्वतंत्र सुविधा नसल्याने त्यांना रस्त्यावरच वाहने उभी करावी लागत आहेत. परिणामी भर रस्त्यातच वाहने पार्क केल्याने वाहतूक कोंडी होते आणि पोलिसांकडून अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाते. त्यामुळे प्रवाशांनाही दंडाचा भुर्दंड सहन करावा लागतो. मात्र, या त्रासातून प्रवाशांची मुक्तता होणार आहे. मेट्रो स्थानकांच्या परिसरात महापालिकेकडून महामेट्रोला २० जागा पार्किंगसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडून या जागांची अंतिम नोंदणी करण्यात आली असून, लवकरच त्या जागा महामेट्रोला हस्तांतरित करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या प्रकल्प व्यवस्थापन विभाग प्रमुख दिनकर गोजारे यांनी दिली.
PUNE : पुण्यातील देवींची शक्तिस्थळे दर्शनासाठी पर्यटन बससेवा..नवरात्रोत्सवात पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यातील देवींची शक्तिस्थळे दर्शनासाठी पीएमपीएमएलकडून दोन विशेष पर्यटन बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुटीबरोबरच ग्रुप बुकिंगसाठी बससेवा उपलब्ध होणार आहे, या सेवेचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे..
PUNE : भुसार बाजारामध्ये भगर, शेंगदाणाचे दर स्थिर नवरात्रोत्सवामुळे साबुदाणा दरात वाशारदीय नवरात्रोत्सवास उद्या पासून सुरूवात होत आहे. यामुळे मार्केट यार्डातील भुसार बाजारात साबुदाणा, भगर आणि शेंगदाण्याची मागणी वाढली आहे. परिणामी, साबुदाणाच्या भावात किलोमागे ४ ते ५ रुपयांनी वाढ झाली आहे. शेंगदाणा आणि भगरीचे भाव स्थिर आहेत.
देशात तामिळनाडू राज्यातील सेलम या एकमेव जिल्ह्यात साबुदाण्याचे उत्पादन होते. तेथून मालाची निर्यात होते. येथील घाऊक बाजारात एक्स्ट्रा सुपर फाइन, मिल्क व्हाइट आणि साधा प्रकारातील साबुदाणा दाखल होत असून दररोज ९० ते ११० टन आवक होत आहे.
YAVTMAL: - पुरामुळे शेतातील माती गेली वाहुन,ढगफुटीच्या पावसाने कुर्हाड शिवारात शेतकऱ्यांचे स्वप्न उद्ध्वस्तढगफुटी सदृश पावसाने शेतकऱ्यांचे कष्टाचे पीक क्षणात वाहून गेले.यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील कामठवडा कुऱ्हाड शेतशिवारात नाल्यालगत शेत आहे.नाल्याला पूर आल्याने पुराचे पाणी प्रचंड वेगाने शेतात शिरले, काही तासांतच शेतात उभे पीक पाण्याने गिळंकृत केले.शेतात केवळ आता दगड धोंडे उरले असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी राठोड यांचेच नव्हे तर नाल्याच्या दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांचेही शंभर टक्के पीक उद्ध्वस्त झाले आहे. शेतकरी हवालदिल झालाय.एकीकडे कर्जाचा डोंगर, दुसरीकडे पिकांचे नुकसान, अशा दुहेरी संकटात शेतकरी कुटुंबे सापडली आहेत.महसूल व कृषी विभागाने तातडीने पंचनामा करून शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा. आम्हाला जगण्यासाठी आधार हवा आहे, अशी आर्त हाक पीडित शेतकरी देत आहेत.
SATARA : नमो युवा रन मॅरेथॉन स्पर्धेला झाली सुरुवातनमो युवा रन मॅरेथॉन स्पर्धेला झाली सुरुवात
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे, भाजप जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले यांच्या उपस्थित फ्लॅग ऑफ करून मॅरेथॉन स्पर्धेला झाली सुरुवात
पोलीस कवायत मैदान पासून राजवाडा आणि पुन्हा पोलीस कवायत मैदानाचा पाच किलोमीटरचा मॅरेथॉनचा मार्ग
सातारा जिल्ह्यातून 2 हजाराहून अधिक स्पर्धकांचा या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी
DHARASHIV : : भुम तालुक्यात मुसळधार पाऊसाने रस्ते व शेती पिक पाण्याखालीधाराशिव च्या भुम तालुक्यात गेली तीन दिवसापासून सातत्याने मुसळधार पाऊस सुरू असुन या पावसामुळे भोनगिरी,साबळेवाडी शिवारातील शेतरस्ते देखील पाण्यात गेले आहेत तर शेतातील काढणीला आलेले सोयाबीन व जमीन देखील खरवडुन गेली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावुन गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.शासनाने तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी या भागातील शेतकरी करत आहे
कविता बोलताना टाळ्या वाजवल्या नाहीत म्हणून चिमुकल्याला कानाखाली मारली !उल्हासनगर मध्ये एका प्ले ग्रुप मध्ये शिकणाऱ्या चिमुकल्याने कविता म्हणताना टाळ्या वाजवल्या नाही म्हणून शिक्षिकेने चिमुकल्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी प्ले ग्रुप ची शिक्षिका गायत्री पात्रा हिच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.