Nitin Gadkari: मी ब्राह्मण जातीचा... परमेश्वराने उपकार केले, आम्हाला आरक्षण नाही; नितीन गडकरी असं का म्हणाले?
esakal September 22, 2025 12:45 AM

राज्यात आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. नागपूरात हलबा महासंघाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. मराठा समाजानंतर आता बंजारा, धनगर आणि वंजारी समाज आरक्षणासाठी लढत आहेत. यामुळे राज्य सरकारवर देखील ताण निर्माण झाला आहे.

नितीन गडकरी काय म्हणाले?

मी ब्राह्मण जातीचा आहे. आमच्यावर परमेश्वराने सर्वात जास्त उपकार केले असतील तर ते म्हणजे आम्हाला आरक्षण नाही. महाराष्ट्रात ब्राह्मणांना फार महत्त्व नाही. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये खूप महत्त्व आहे. महाराष्ट्रात मराठा शक्तिशाली आहेत, असं गडकरी म्हणाले.

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये ब्राह्मणाचं महत्त्व

नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले, “आमच्यावर परमेश्वराने सर्वात मोठा उपकार केला असेल तर तो म्हणजे आम्हाला आरक्षण नाही. मी ब्राह्मण आहे, पण महाराष्ट्रात ब्राह्मणाचं महत्त्व नाही. मात्र उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये ब्राह्मणाचं महत्त्व खूप आहे. तिथं दुबे, त्रिपाठी यांचं राज्य पावरफुल आहे. महाराष्ट्रात जसं मराठा समाजाचं महत्त्व आहे, तसंच उत्तर प्रदेश–बिहारमध्ये ब्राह्मणाचं महत्त्व आहे.”

Nitin Gadkari : चाकण, मोशी वाहतूक कोंडी कायमची संपुष्टात येणार; केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी मी जातपात मानत नाही

मी जातपात मानत नाही. माणूस जात, पंथ, धर्म किंवा भाषेने मोठा होत नाही, तर गुणांनी मोठा होतो. समाजातील सुशिक्षित लोकांनी ज्यांची मुलं सुशिक्षित झाली आहेत आणि समाजाला सुशिक्षित बनवत असताना आर्थिक प्रगती करत आहेत, त्यांनी मुलांना दिशा मिळवून दिली पाहिजे, असंही ते म्हणाले.

स्पष्ट बोलणारे नेते

नितीन गडकरी यांचं नाव भाजप आणि राजकारणात स्पष्ट बोलणारे नेते म्हणून चर्चेत असतं. अनेक नेत्यांनाही ते थेट बोलतात. यापूर्वी त्यांनी राज्यातील शिक्षण संस्थांवर भाष्य केलं होतं. शिक्षकांकडून कसा पैसा घेतला जातो हे त्यांनी सांगितलं होतं. तसेच, राजकीय नेत्यांना धार्मिक कार्यक्रमांपासून दूर ठेवा असंही ते म्हणाले होते.

Nitin Gadkari : RSS-BJP मध्ये मतभेद? राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड का लांबतेय? नितीन गडकरी म्हणाले, 'तुम्ही चुकीच्या व्यक्तीला...'
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.