Kothrud Crime : कोथरूडमध्ये गोळीबार प्रकरणी घायवळ टोळीची धिंड, गुंडांचा माज उतरला पण गुन्हेगारी कमी होणार?
esakal September 22, 2025 02:45 AM

पुण्यातील कोथरूड परिसरात १८ सप्टेंबरला मुठेश्वर गणपतीजवळ गाडीला साईड न दिल्यामुळे एका व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणात कुख्यात गुंड निलेश घायवळ टोळीतील सदस्यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांनी सामान्य नागरिकावर गोळीबार करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. अटक करण्यात आलेल्या गुंडांची नावे अशी आहेत : मयूर कुंबरे, मयंक व्यास, गणेश राऊत, दिनेश फाटक आणि आनंद चादलेकर.

दरम्यान, या पाच जणांची पोलिसांनी कोथरूड परिसरात धिंड काढली आहे. ज्या ठिकाणी गुन्हा केला, त्याच ठिकाणी पोलिसांनी ही धिंड काढली. पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर हा गुन्हा घडल्यामुळे पोलिसांवरही प्रश्न उपस्थित झाले होते. यापूर्वीही कोथरूडमध्ये असे प्रकार घडले आहेत.

निलेश घायवळ हा पुण्यातील कुख्यात गुंडांपैकी एक आहे. त्याच्यावर यापूर्वी खंडणी, मारहाण आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगण्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्या टोळीने दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला आहे.

गोळीबार का झाला होता?

गाडीला पुढे जाण्यास साईड न दिल्यामुळे हा गोळीबार झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, हा कुणाला इशारा होता का? अशीही चर्चा निर्माण झाली.

Pune Crime : पुण्यात गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांची कडक मोहीम; नाकाबंदी आणि कोम्बिंग ऑपरेशनला सुरुवात पोलिसांनी काय म्हटलं होतं?

कोथरूडपोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप देशमाने यांच्या माहितीनुसार, प्रकाश धुमाळ हा मित्रांसोबत रात्री मुठेश्वर चौकात गप्पा मारत होता. दुचाकीवरून आलेल्या आरोपींना जायला रस्ता दिला नाही म्हणून हा वाद झाला. ही घटना गँगवारची नाही. कार प्रकाश धुमाळ यांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी आढळली नाही.

धिंड काढून प्रश्न सुटणार का?

यापूर्वी मुठेश्वर गणपती लाईनमधील भाजी मार्केटजवळ एका व्यक्तीवर कोयत्याने वार करण्यात आला होता. तसेच खासदार मुरलीधर मोहळ यांच्या कार्यकर्त्यावरही हल्ला झाला होता. त्यामुळे कोथरूडमधील गुंडांना पोलिसांचा धाक नाही, अशी चर्चा आहे. कारण यापूर्वीही गुन्हेगारांची धिंड काढल्याचे प्रकार घडले आहेत. पण यामुळे गुन्हेगारी कमी होत नाही.

Kothrud Crime: "कोथरूडच बीड होण्यापासून वाचवा" गुन्हेगारीच्या वाढत्या थरारामुळे नागरिकांमध्ये चिंता, बॅनरने वेधलं लक्ष!
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.