IND vs AUS : 4,4,4,4,4,4,4,6, वैभव सूर्यवंशीचा तडाखा, पहिल्याच सामन्यात वादळी खेळी, ऑस्ट्रेलियाला धुतलं, Video
Tv9 Marathi September 22, 2025 12:45 AM

आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वात अंडर 19 टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात झाली आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया अंडर 19 संघाविरुद्ध 21 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान एकूण 3 एकदिवसीय आणि 4 दिवसांचे 2 सामने खेळणार आहे. भारताचा युवा आणि स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशी याने पहिल्याच यूथ वनडे मॅचमध्ये तडाखेदार खेळी करत कांगारुंच्या गोलंदाजांची धुलाई केली. वैभवचं अर्धशतक अवघ्या काही धावांनी हुकलं. मात्र वैभवने आयुष म्हात्रे याच्यासह टीम इंडियाला चांगली सुरुवात मिळवून दिली. वैभवने विजयी धावांचा पाठलाग करताना झंझावाती खेळी केली.

टीम इंडियाची स्फोटक सुरुवात

भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला 50 ओव्हरमध्ये 9 झटके देत 225 रन्सवर रोखलं.  त्यानंतर भारताला आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी या सलामी जोडीने कडक आणि स्फोटक सुरुवात करुन दिली. या दोघांनी पहिल्या 29 बॉलमध्ये अर्धशतकी भागीदारी केली. या दरम्यान वैभवने चौफेर फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची धुलाई केली. तर आयुषने हुशारीने वैभवला स्ट्राईक मिळवून देत फटकेबाजी करण्यास मदत केली. दोघांनीही 4.5 ओव्हरमध्ये 50 धावा जोडल्या. मात्र ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला पुढील 3 बॉलमध्ये 2 झटके दिले.

चांगल्या सुरुवातीनंतर झटपट 2 झटके

ऑस्ट्रेलियाने पाचव्या ओव्हरमधील सहाव्या अर्थात शेवटच्या बॉलवर वैभवला आऊट केलं. वैभवने 22 बॉलमध्ये 172. 73 च्या स्ट्राईक रेटने 38 रन्स केल्या. वैभवने या 38 पैकी 34 धावा या फक्त 8 चेंडूत आणि एका जागेवर उभे राहत केल्या. वैभवने या खेळीत 7 चौकार आणि 1 षटकार लगावला. वैभवकडून मोठ्या खेळीची आशा होती. मात्र वैभव आऊट झाला.

वैभव सूर्यवंशीची जोरदार फटकेबाजी

VAIBHAV SURYAVANSHI SHOW FOR INDIA U-19. 🥶 pic.twitter.com/AyRstV8xCg

— Johns. (@CricCrazyJohns)

वैभवनंतर कर्णधार आयुष म्हात्रे आऊट

वैभव पाठोपाठ 2 बॉलनंतर भारताने आणखी एक विकेट गमावली. ऑस्ट्रेलियाने भारताचा कर्णधार आयुष म्हात्रे याला आऊट केलं. आयुषला पहिल्या सामन्यात काही खास करता आलं नाही. आयुषने 10 बॉलमध्ये 60 च्या स्ट्राईक रेटने 6 धावा केल्या. त्यामुळे टीम इंडियाचा स्कोअर 50-0 वरुन 5.2 ओव्हरनंतर 50-2 असा झाला. त्यामुळे आता टीम इंडियाचे इतर फलंदाज उर्वरित 176 धावांचं आव्हान किती विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण करणार? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.