एकीकडे इस्राईल पॅलेस्टाईन राष्ट्राविरोधात असताना आता पॅलेस्टाईन राष्ट्राला समर्थन देणाऱ्या देशांची संख्या वाढतच चालली आहे. माल्टाने आता सोमवारी (22 सप्टेंबर, 2025) संयुक्त राष्ट्र महाभेत पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून औपचारिक मान्यता देण्याची घोषणा करणार आहे. माल्टाचे पंतप्रधान कार्यालयाने या संदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलेय की ते देखील हे पाऊल उचलणाऱ्या देशांच्या समुहात सामील होणार आहेत.
‘द टाईम्स ऑफ इस्राईल’ नुसार माल्टाचे पंतप्रधान रॉबर्ट अबेला यांनी मे महिन्यात पॅलेस्टाईलना देश म्हणून मान्यता देण्याची योजना आखली होती. भूमध्य सागरीय युरोपिय संघाच्या या बेटाचा पॅलेस्टाईलच्या मुद्द्यांना नेहमीच पाठींबा देण्याचा इतिहास राहिला आहे. यामुळे इस्राईल देखील या देशाचे राजकीय संबंध कायम असून दोन राष्ट्रात समेट घडावा याचे समर्थन केले आहे. माजी पॅलेस्टाईन नेते यासर अराफत यांच्या पत्नी अनेक वर्षे या बेट सदृश्य देतात राहिल्या आहेत.
रविवारी रात्री उशीरा पंतप्रधान अबेला यांनी एक फेसबुक पोस्टद्वारे गाझापट्टीत पाठवलेल्या अन्न ( पीठ ) मदतीचा उल्लेख करत म्हटले की पॅलेस्टाईनला मान्यता देण्याच्या पूर्व संध्येला माल्टाच्या वतीने मदत म्हणून पीठाचा पुरवठा रवाना झाला आहे. त्यांनी सांगितले की पॅलेस्टाईनला मान्यता देणे हे एक ‘ऐतिहासिक’पाऊल आहे. आणि माल्टा या क्षेत्रात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रतिबद्ध आहे.
एक दिवसाआधी रविवारी (21 सप्टेंबर, 2025) रोजी कॅनडा आणि ऑस्ट्रेलियानंतर युकेने पॅलेस्टाईलना स्वतंत्र आणि सार्वभौम देशाच्या रुपात मान्यता देण्याची घोषणा केली आहे. ब्रिटीश पीएम कीर स्टार्मर यांनी एक मोठा व्हिडीओ पोस्टद्वारे पॅलेस्टाईनला पाठींबा देत असल्याचे जाहीर केले. या निर्णयाचा इस्राईलने मात्र निषेध केला आहे.
हमासच्या 7 ऑक्टोबर, 2023 च्या नृशंस हल्ल्यानंतर इस्राईलने पॅलेस्टाईनच्या एकतर्फी मान्यतेला ‘दहशतवादासाठी पुरस्कार’ म्हटले होते. इस्राईली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटले की, ‘आमच्या जमीनीवर अतिरेक्यांचे राज्य थोपवण्याच्या या नव्या प्रयत्नाला उत्तर आपण अमेरिकेहून आल्यानंतर देईल.’
तिन्ही देशांच्या सरकारला संबोधित करताना ते म्हणाले की,’ 7 ऑक्टोबरच्या भयानक नरसंहारानंतर पॅलेस्टाईन देशाला मान्यता देणाऱ्या माझा एक स्पष्ट संदेश आहे की तुम्ही दहशतवादा मोठे बक्षिस देत आहात. आणि माझ्याकडे तुमच्यासाठी एक आणखी संदेश आहे की असे काही होणार नाही.जॉर्डन नदीच्या पश्चिमेला कोणताही पॅलेस्टाईन देश नसेल.’