अक्षय बडवे, पुणे प्रतिनिधी
NCP leader Chandrakant Bagal revolver case at Pune airport : राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी जिल्हा परिषद सदस्य अन् विधान परिषदेचे उमेदवार चंद्रकांत बागल यांच्या बॅगेत रिव्हॉल्वर अन् पाच जिवंत काडतुसे सापडली आहेत. पुणे विमानतळावर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्याहून वाराणासीला जाताना बागल यांच्या बॅगमधून रिव्हॉल्वर अन् काडतुसे आढळली. यानंतर पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. वाराणसीला रिव्हॉल्वर का घेऊन निघाले होते? फक्त महाराष्ट्रापुरताच परवाना असताना ते रिव्हॉल्वर घेऊन वाराणसीला का निघाले होते? यासारखे प्रश्न उपस्थित राहिले आहेत.
पुणेते वाराणसी या विमानाने प्रवास करणाऱ्या माजी जिल्हा परिषद सदस्याच्या बॅगमध्ये रिव्हॉल्वर आढळून आल्याने खळबळ उडाली. चंद्रकांत प्रभाकर बागल (वय ६३, रा. गादेगाव, पंढरपूर) यांच्या बॅगेत रिव्हॉल्वर आणि काडतुसे आढळून आले. चंद्रकांत बागल हे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर असून त्यांनी २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंढरपूर विधानसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना पराभवाचा धक्का बसला होता. विमानात जाताना बॅगमध्ये रिव्हॉल्वर अन् काडतूस आढळल्या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
Maharashtra Rain Alert : मेघगर्जनेसह पाऊस धुमाकूळ घालणार, पुढील ४ दिवस राज्यात कोसळधार, पाहा कोणत्या जिल्ह्यांना दिला अलर्टपोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूरचे चंद्रकांत बागल हे शुक्रवारी पुणेते वाराणसी या प्रवासी विमानाने प्रवास करणार होते. विमानात चेक इन करण्यापूर्वी त्यांची बॅग स्कॅनरमध्ये तपासण्यासाठी दिली. त्यावेळी त्यांच्या बॅगमध्ये रिव्हॉल्वर अन् काडतुसे आढळली. उड्डाणापूर्वी सीआयएसएफ आणि विमानतळ प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी तपासणीदरम्यान हे शस्त्र जप्त केले आहे. बागल हे रिव्हॉल्वर आणि ५ जिवंत काडतुसे घेऊन वाराणसीला जाणार होते. मात्र त्यांचा परवाना केवळ महाराष्ट्रापुरता वैध असल्याचे उघड झाल्याने त्यांच्यावर भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ कलम ३० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीनंतर त्यांना नोटीस बजावून सोडण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचे सोशल मीडिया हॅक, खात्यावर पाकिस्तानचे व्हिडिओ