World Map: ब्रिटनने जगाचा नकाशा बदलला, ‘या’ देशाला मिळाली नकाशावर जागा, इस्रायलमध्ये खळबळ
GH News September 22, 2025 09:16 PM

जगातील काही देशांनी पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली आहे. त्यानंतर आथा लगेचच ब्रिटनने एक सुधारित नकाशा प्रसिद्ध केला. यात काही बदल करण्यात आले आहेत. या नकाशात पॅलेस्टाईन हा इस्रायलला लागून असलेला एक वेगळा देश दाखवण्यात आला आहे. त्यामुळे इस्रायलमध्ये खळबळ उडाली आहे. तसेच फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील प्रसिद्ध आयफेल टॉवरवर पॅलेस्टाईनचा ध्वज फडकवण्यात आला आहे. याचा अर्थ आता जगातील देश पॅलेस्टाईनला एक देश म्हणून स्वीकारायला लागले आहेत.

आयफेल टॉवरवर पॅलेस्टाईनचा झेंडा

आयफेल टॉवरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, यामध्ये एका बाजूला पॅलेस्टाईन आणि दुसऱ्या बाजूला इस्रायल दिसत आहे. गेल्या 24 तासांत ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि पोर्तुगालने पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली आहे. या चार देशांच्या पाठिंब्यामुळे इस्रायलला मोठा धक्का बसला आहे. आगामी काळात बहुतेक युरोपीय देश पॅलेस्टाईनला उघड समर्थन देण्याची शक्यता आहे.

अनेक देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता

संयुक्त राष्ट्रांच्या 5 स्थायी सदस्यांपैकी 4 देशांनी पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली आहे. मात्र इस्रायलचा मित्र असलेल्या अमेरिकेने मात्र पॅलेस्टाईनला विरोध केला आहे. या 4 स्थायी सदस्यांव्यतिरिक्त 150 हून अधिक देशांनी पॅलेस्टाईनला मान्यता देण्याची घोषणा केली आहे. तसेच सौदी अरेबिया आणि फ्रान्स संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात पॅलेस्टाईनशी संबंधित विधेयक मांडणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. यामुळे इस्रायलला फटका बसण्याची शक्यता आहे.

इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये वाद

इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये 1948 पासून युद्ध सुरू आहे. जेरुसलेममधील जमिनी आणि पवित्र अल-अक्सा मशिदीबाबत वाद आहे. अमेरिकेच्या पाठिंब्याने इस्रायल पॅलेस्टाईनमध्ये आपला फोजफाटा वाढवत आहे. याचा सामना करण्यासाठी सौदी अरेबियाने 2 स्टेट थेअरी राबविण्याचे ठरवले आहे. सौदी अरेबियाच्या म्हणण्यांनुसार, दोन्ही देशांमध्ये सीमा स्थापित झाल्यानंतर आणि पॅलेस्टाईन एक देश बनल्यानंतर वाद मिटेल. युद्धामुळे पॅलेस्टाईनमध्ये कोणतेही सरकार नाही. मात्र हमासचे येथील प्रशासनावर नियंत्रण आहे. त्यामुळेच इस्रायल सतत हमासच्या अड्ड्यांवर हल्ले करत असतो.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.