मुंबई : कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसणाऱ्या एक महिला मुंबई युवक काँग्रेसची अध्यक्ष झाली आहे. सोमवारी (ता. २२) अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत झीनत शबरीन यांना तब्बल १०,०७६ मते मिळाली असून, मुंबई युवक काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरणार आहे. नेतृत्वातील हा बदल आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसला फायदा देणारा ठरेल, असा विश्वास पक्षाला आहे.
राहुल गांधीयांच्या सूचनेनुसार युवक काँग्रेसमध्ये नियुक्त्या न करता पदाधिकाऱ्यांच्या निवडणुका घेतल्या जातात. मुंबई युवक काँग्रेस अध्यक्ष या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार रिंगणात होते. १६ मे ते १७ जूनदरम्यान मतदान झाले. निकाल जाहीर झाल्यानंतर झीनत शबरीन सर्वाधिक मतांनी विजयी ठरल्या.
झीनत यांचे वय ३१ वर्ष असून, त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमी राजकीय नाही. त्यांच्या घरातून राजकीय पक्षात काम करणाऱ्या त्या पहिल्या सदस्य असणार आहेत. विशेष म्हणजे, झीनत या मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या विरोधी गटातील आहेत. विरोध असूनही झीनत यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. झीनत या उच्चशिक्षित आहेत, शालेय जीवनापासून त्या प्राणी संरक्षण चळवळीत कार्यरत आहेत.
मुंबईत विविध सामाजिक प्रश्नांवर त्यांनी आंदोलने केली. अल्पसंख्याक समाजातील झीनत यांच्यामुळे नव्या पिढीतील व उच्चभ्रू वर्गातील युवक पुन्हा काँग्रेसकडे वळतील, अशी अपेक्षा काँग्रेसला आहे. महिला व युवकांना भेडसावणाऱ्या मुद्द्यावर फोकस करणार असल्याचे शबरीन यांनी सांगितले.
Mumbai News: आता वाहनतळ चार मजली! किनारी रस्ता प्रकल्पात आराखडा बदललाबेरोजगारी, महागाई व आरोग्यविषयक समस्यांवर पक्षाच्या संघटनेच्या माध्यमातून मी आवाज उचलणार आहे. पक्षाने माझ्यावर टाकलेला विश्वास मला सार्थ करून दाखवायचा आहे.
- झीनत शबरीन, विजयी उमेदवार