Video: फक्त टी-शर्ट घातलेल्या मुलाकडे पाहात राहा… कळेल का व्हायरल होतेय CCTV फुटेज
Tv9 Marathi September 24, 2025 09:45 PM

Viral Video: सोशल मीडियावर अनेक वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता देखील सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्ही देखील हैराण व्हाल… सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत असलेला व्हिडीओ कोणत्या केरास्टेस शॉपमधील असल्याचं सांगण्यात येत आहे. व्हिडीओमध्ये टी-शर्टमध्ये असलेल्या तरुणाने चोरी केली आणि त्याने केलेली चोरी कोणाच्या लक्षात देखील आली नाही. पण CCTV फुटेजमध्ये सर्वत्र काही कैद झालं आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिली आहे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, केरास्टेस शॉपच्या काउंटरवर एक बाजूला पुजेची थाळी दिसत आहे. ज्यामध्ये 500 रुपये आहेत. शॉपमध्ये दोन व्यक्ती येतात आणि काउंटरवर बसलेली तरुणी त्या दोन व्यक्तींसोबत बोलू लागले. तेव्हा एका तरुणाची नजर पुजेच्या थाळीत असलेल्या 500 रुपयांकडे जाते. अशात तरुण हळू हात पुढे करत पुजेच्या थाळीतील 500 रुपये चोरतो… या चोरीबद्दल कोणाला काही माहिती देखील होत नाही. 500 रुपये चोरल्यानंतर तरुण शॉपमधून बाहेर जातो…

Look at that T-shirt guy near counter 💀 pic.twitter.com/0yv32STho0

— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh)

काउंटरवर बसलेली तरुणी तिच्या समोर उभ्या असलेल्या दुसऱ्या पुरुषाशी बोलत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. दुकानात दुसरी एक महिला फोनवर बोलत होती आणि गार्ड बाजूला उभा होता. चोरी त्यांच्या समोरच झाली पण कोणाच्याही लक्षात आली नाही.

सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडीओ…

चोरी झाल्याचं कोणाच्या लक्षात नसेल आलं पण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सर्वकाही कैद झालं आहे. CCTV फुटेज समोर आल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली. सध्या व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत. सध्या सोशल मीडियावर गुपचूप चोरी करणाऱ्या तरुणाची चर्चा होत आहे.

सांगायचं झालं तर, सोशल मीडियावर एक असं माध्यम आहे जिथे चांगल्या – वाईट दोन्ही गोष्टी व्हायरल होत असतात. आजच्या युगात सोशल मीडिया प्रसिद्धी आणि लोकप्रियतेसाठी महत्त्वाचं माध्यम आहे. याचे अनेक फायदे तसेच तोटे देखील आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.