बीडच्या माजलगाव मध्ये हॉटेलमध्ये जेवायला गेलेल्या लक्ष्मण हाके समर्थक पवन करवर याला काही तरुणांकडून अमानुष मारहाण झाली आहे या घटनेच्या निषेधार्थ आणि तात्काळ कार्यवाहीची मागणी करण्यासाठी स्वतः ओबीसी नेते लक्ष्मण हाके पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झाले असून त्यांच्यासोबत समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे तात्काळ कार्यवाही करून आरोपींना अटक करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
डोंबिवलीतील सावळाराम क्रीडा संकुल येथे "आत्मनिर्भर भारत" या संकल्पनेचे उद्घाटनभाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते डोंबिवलीतील सावळाराम क्रीडा संकुल येथे "आत्मनिर्भर भारत" या संकल्पनेचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आवाहन जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी बलून हवेत सोडण्यात आला.
विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबवून आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे आवाहन रवींद्र चव्हाण यांनी केले.
डोंबिवलीत भाजप–काँग्रेस संघर्ष पेटला!डोंबिवलीत काँग्रेस आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्षाने चांगलाच उग्र वळण घेतलं आहे. ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते प्रकाश उर्फ मामा पगारे यांना भाजप कार्यकर्त्यांनी जबरदस्तीने साडी नेसवली, या प्रकरणावरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप उसळलाय.या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्त्यांनी कल्याणचे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांची भेट घेतली. भाजप पदाधिकाऱ्यांवर तत्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी काँग्रेसकडून करण्यात आली.याचबरोबर, भाजपवर कारवाई लांबली तर काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरून आंदोलन छेडतील, असा इशाराही सचिन पोटे यांनी दिला.या संपूर्ण प्रकरणामुळे डोंबिवलीतील राजकीय वातावरण तापलं असून पुढील काही दिवसांत काँग्रेस-भाजप संघर्ष अधिक चिघळण्याची शक्यता आहे.
Dharashiv: ओला दुष्काळ जाहीर करा,वालवड येथील शेतकऱ्यांची मागणीउपमुख्यमंत्री अजित पवार आज वालवड गावाला देणार भेट, नुकसानीची करणार पाहणी
गावातील दुधना नदीला आलेल्या पुरामुळे सोयाबीन,व शेत जमीध खरवडुन गेल्याने मोठ नुकसान
अनेकांची जनावरे,मोटारसायकल ही गेली वाहुन
सरकारने कर्जमाफी करुन झालेल्या नुकसानीचे तातडीने भरपाई देण्याची गावकऱ्यांची मागणी
Metro 7: मेट्रो दोन तासांपासून खोळंबली, मुंबईकरांची कोंडीमेट्रो-७ च्या रेड लाईन मार्गावर गोंधळ निर्माण झाला आहे. गुंदवलीकडे जाणाऱ्या मेट्रोला ओवरीपाडा स्थानकापूर्वी तांत्रिक अडचण निर्माण झाली. सकाळी ८ वाजल्यापासून प्रवाशांना मेट्रो वेळेत येत नसल्यामुळे अडचणींचा सामना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मागील दोन तासांपासून मेट्रो खोळबंली आहे. मेट्रो बंद असल्याने पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडीची शक्यता आहे.
Dharashiv: धाराशिव जिल्ह्यातील वालवड येथील शेतामध्ये सहा फुटांचे खड्डेदुधनी नदीला आलेल्या पुरात शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकासह जमिनी गेल्या वाहून
शेतकरी अमोल शिंदे यांच्या शेतामध्ये सहाफुटाचे खड्डे तर सहा एकरातील सोयाबीन मातीमोल
शेतकऱ्यांचे २५ लाखांचे नुकसान
उपमुख्यमंत्री अजित पवार याच वालवड येथील नुकसानी ची करणार पाहणी
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये जोरदार पाऊस! रस्ते पूल वाहून गेल्याने ग्रामस्थांचा धोकादायक प्रवासअहिल्यानगर जिल्ह्यातील दक्षिण भागाला पावसाने चांगलेच झोपले असून अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेले आहेत त्यामुळे गावांचा संपर्क तुटला असून गावातील नागरिकांना गावाबाहेर जाण्यासाठी धोकादायक प्रवास करून गावाबाहेर पडावे लागत आहेत शेवगाव तालुक्यातील प्रभू वाडगाव या गावाला मुख्य मार्गावरून जोडणारा रस्ता पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेल्यामुळे गावातील वयोवृध्द ग्रामस्थांना पाण्यातूनच मार्ग काढून जीवावर उदार होऊन मार्गक्रमण करावे लागत आहे. प्रशासनाने लवकरात लवकर रस्त्याचे काम व पुलाचे काम करून तात्पुरता वाहतुकीसाठी रस्ता करून द्यावा अशी मागणी प्रभू वाडगाव ग्रामस्थानी केली आहे
Pune: पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात छताचा भाग कोसळलासांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्याचा सांस्कृतिक केंद्रबिंदू असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराची दिवसागणिक दुरवस्था होत चाललेली आहे. लाखो रुपये देखभाल दुरुस्तीवर खर्च करून देखील ही दुरवस्था कायम आहे. मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनाच्या छताचा भाग कोसळला असल्याचा आरोप आता करण्यात येतोय. बालगंधर्व मधील कला दालनातील पीओपीचे फॉल सिलिंग खाली कोसळले. सुदैवाने यावेळी दालनात कोणी नसल्याने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.
पतित पावन संघटनेने या घटनेला कारणीभूत असलेल्या ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. दुसऱ्या बाजूला, पुणे महापालिकेने या घटनेची दखल घेऊन अधिकाऱ्यांनी कला दालनाची पाहणी केली आहे...
Metro 7: मेट्रो-७ च्या रेडलाईन मार्गावर गोंधळमेट्रो-७ च्या रेडलाईन मार्गावर गोंधळ निर्माण झाला आहे. गुंडवलीकडे जाणाऱ्या मेट्रोला ओव्हरीपाडा स्थानकापूर्वी तांत्रिक अडचण निर्माण झाली. सकाळी ८ वाजल्यापासून प्रवाशांना मेट्रो वेळेत येत नसल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मेट्रो बंद असल्याने पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडीची शक्यता आहे.
Beed: धक्कादायक !10 वर्षाचा चिमुकला गेला पुराच्या पाण्यात गेला वाहूनबीडमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि धुवाधार पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे पुराच्या पाण्यात पिंपळवाडी येथील दहा वर्षाचा आदित्य कळसाने हा वाहून गेला आणि त्याच्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेने पिंपळवाडी गावावर आणि कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून कुटुंबीय आज रोजी ढसाढसा रडत आहे आमच्या सर्वस्व गेलं आहे आता मदत मागून तरी काय उपयोग मात्र काहीतरी दिलं पाहिजे
Nashik: नाशिकच्या पाईपलाईन रोडवर रेशन कार्ड आढळल्याने खळबळ- रेशन कार्ड नेमके कुणी फेकले, याबाबत शोध सुरू
- रस्त्यावर अचानक फेकलेले रेशनकार्ड आढळल्याने चर्चना उधाण
- रात्रीच्या सुमारास रेशन कार्ड फेकून आज्ञातांनी पळ काढल्याची स्थानिकांची माहिती
Beed: संतोष देशमुख खून प्रकरणाची १५वी सुनावणी आज होणारसंतोष देशमुख खून प्रकरणाची 15 वी सुनावणी आज जिल्हा व सत्र न्यायालयात पार पडणार...!
संतोष देशमुख खून प्रकरणातील 15 व्या सुनावणीमध्ये नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आजही सुनावणी सकाळी 11 वाजता जिल्हा व सत्र न्यायालयात पार पडणार आहे.
Shirur: पुण्याच्या शिरूर शहरात पहाटेच्या सुमारास चोरट्यांचा सराफ दुकानावर दरोडाशिरुर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सरदार पेठेतील अमोल ज्वेलर्स हे सोन्याचे दुकानात कार मधून आलेल्या चार चोरट्यांनी दरोडा टाकत लाखो रुपयांचा ऐवज सोने चांदीचे दागिण्यांवर हात मारलाय नेलंय,यामध्ये लाखो रुपयांचा ऐवज लंपास केलाय यावेळी शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी शिरूर पोलीस दाखल होऊन दरोडेखोरांना पकडण्यासाठी पोलीसांच्या दोन टिम तैनात केल्यात
Jalgaon: सुवर्णभरारी १,१५,००० च्या दिशेने दोनच दिवसांत तीन हजारांनी वाढले भावजळगाव नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दोनच दिवसांत सोने-चांदीची मोठी भाववाढ झाली आहे. मंगळवारी सोन्याच्या भावात एक हजार रुपयांनी वाढ होऊन ते एक लाख १४ हजार ४०० रुपयांवर पोहोचले आहे. चांदीच्याही भावात एक हजार रुपयांची वाढ होऊन ती एक लाख ३६ हजार रुपयांवर पोहोचली. दोन दिवसांत सोने दोन हजार ९५० रुपयांनी, तर चांदी चार हजार ५०० रुपयांनी वधारली.
nashik-malegaon-सततच्या पावसाने मातीचा पाझर तलाव फुटलानाशिकच्या माळमाथा गावात गेल्या तीन-चार दिवसां पासून सतत पाऊस पडल्याने शेती पिकांचे नुकसान झाले असून भिलकोट येथे काल संध्याकाळच्या सुमारास जोरदार पावसामुळे मातीचा पाझर तलाव अचानक फुटल्याने तलावा लगत असलेल्या फकिरा सोनवणे यांच्या शेतात पाणी घुसल्याने त्यांच्या शेत पिकांसह संपुर्ण माती वाहून गेली तर पाण्याच्या प्रवाहात माती वाहून आल्याने विहिर मातीने पुर्णत भरुन गेली असून शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.
Maharashtra Live News Update: सोलापूर-कोल्हापूर महामार्ग बंद, तिऱ्हे पूल पाण्याखालीसीना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने सोलापूर - कोल्हापूर महामार्गवरील तिऱ्हे पूल गेला पाण्याखाली
तिऱ्हे पूल पाण्याखाली गेल्याने सोलापूर - कोल्हापूर वाहतूक झाली ठप्प
तिऱ्हे परिसरातील दुकाने,बँका, गेल्या पाण्याखाली
तिऱ्हे गाव परिसरातील नागरिकांना प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा
JALNA : पालकमंत्री पंकजा मुंडे आज जालना दौऱ्यावर; परतूर तालुक्यातल्या गोळेगाव येथे पाहणी करणार..पालकमंत्री पंकजा मुंडे आज जालना दौऱ्यावर; परतूर तालुक्यातल्या गोळेगाव येथे पाहणी करणार..
नुकसानीची पाहणी करून गावकऱ्यांसोबत साधनार संवाद आणि घेणार सविस्तर माहिती
गोदावरी नदीच्या पुराचे पाणी गोळेगावच्या चारही बाजूने गावात घुसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झालं होतं
मध्यरात्री आणि पहाटेच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आणि या नदीच्या पाण्यामुळे नदीकाठी असलेल्या गोळेगावला पुराच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात वेढा बसला होता
पुराच्या पाण्याचा वेढा बसल्यानंतर गावकऱ्यांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाल्यामुळे मध्यरात्रीच जवळपास अडीच ते तीन हजार लोकसंख्या असलेल्या गोळेगाव मधील नागरिक शेजारच्या लोणी गाव मध्ये स्थलांतरित झाले होते
JALGOAN ; हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान पंचनामे सुरू; पाचोऱ्यात ४३१, भडगावात ३४१ घरे बाधितपाचोरा भडगाव, दोन्ही तालुक्यांत दोन दिवस सलग झालेल्या मुसळधार पावसाने हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे सुरू असून, आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार पाचोरा तालुक्यात ४३१, तर भडगाव तालुक्यात ३४१ घरांचे नुकसान झाल्याची नोंद झाली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू आजही थांबू शकले नाहीत, इतकी विदारक परिस्थिती शेतीबाबत झाल्याचे नुकसानीवरून दिसून येत आहे.
कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत भडगाव तालुक्यातील २२ हजार ४९३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. हा आकडा आणखी वाढू शकतो. पिंपळगाव बुद्रुक (ता. भडगाव) येथील शेतकरी अमोल ईश्वर पाटील यांच्या पाच शेळ्या नाल्याच्या पाण्यात पाहून गेल्याने दगावल्या.
SOLAPUR | सोलापुरातील सीना नदीच्या महापुराचा एसटी वाहतुकीला फटका, सोलापुरातील एसटी वाहतूक ठप्प.सोलापुरातील सीना नदीच्या महापुराचा एसटी वाहतुकीला फटका, सोलापुरातील एसटी वाहतूक ठप्प.
- सोलापुरातील सीना नदीला आलेल्या महापुरामुळे अनेक महामार्ग बंद झाल्यामुळे इतर भागाशी संपर्क तुटल्यामुळे एसटीची चाकं थांबली.
- पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई आणि विदर्भात जाणाऱ्या एसटी बसेस सोलापुरात अडकून..
- सोलापुरातून इतर ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल
- मराठवाड्यातून आलेल्या प्रवाशांना पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण, मुंबई जाणारी वाहतूक रद्द झाल्यामुळे सोलापूर एसटी स्थानकावर बसण्याचे अली वेळ.
LATUR : उजनी गावाला आजही पुराच्या पाण्याचा फटका, पाण्यामुळे विद्यार्थ्यांची शाळा बंद. नागरिकांच्या घरांमध्ये पाणी.लातूरच्या औसा तालुक्यातील उजनी गावात तेरणा नदीला आलेल्या पुरामुळे जवळपास 60 घर पाण्यात गेली आहेत. तर उजनी परिसरातील 600 एकर क्षेत्रावरील पिकांना देखील फटका बसलाय, गावात पाणी आल्याने, विद्यार्थ्यांची शाळा देखील बंद आहे. दरम्यान याचा आढावा घेतला आहे
नागपूरसहित विदर्भावर पुन्हा अतिवृष्टीचे संकट- 24 ते 27 सप्टेंबर दरम्यान कमी दाब प्रभावामुळे संपूर्ण विदर्भात अतिजोरदार मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज
- बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने पावसाळी वातावरण तयार होत आहे...या काळात अतिवृष्टीसह गारपीट होण्याची ही शक्यता
- नागरिकांनी विशेष करून शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन.
- मान्सूनचा परतीचा प्रवास 10 आक्टोबर नंतर होण्याची शक्यता.
LATUR : ढोकी गावातल्या अनेक घरांमध्ये पाणी, जनजीवन विस्कळीत, सगळा संसार पाण्यात.लातूरच्या ढोकी परिसरात देखील मध्यरात्री तुफान पाऊस झाला आहे, पावसामुळे गावातल्या काही घरांमध्ये पाण्याचे ढव साचले आहेत, संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले, नागरिकांचा संसार पाण्यात तरंगतो आहे. नागरिकांना तात्पुरतं डोकी गावातील ग्रामपंचायत आणि मंदिरात करण्यात आली आहे ,तर आजही जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
JALNA : , प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे जालन्यातील हजारो नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित,जालन्यातील हजारो नुकसानग्रस्त शेतकरी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मदतीपासून वंचित राहिले आहेत.प्रशासनाने जुलै आणि ऑगस्ट मध्ये झालेल्या अतिवृष्टीचा पंचनाम्यांचा अहवाल उशिरा पाठवल्याने दुसऱ्या टप्प्यातील अनुदानापासून जालन्यातील नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहिले आहेत.काल राज्य सरकारने मराठवाड्यातील इतर जिल्ह्याना मदत जाहीर, केली आहे.जालना जिल्ह्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांमध्ये अतिवृष्टीमुळे 12 हजार 215 हेक्टरवरील पिके बाधित झाली होती. मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळ एकीकडे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी असताना जालना जिल्हा दुसऱ्या टप्प्यातील अनुदानापासून वंचित राहिला आहे. जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नजरा शासनाच्या मदतीकडे लागल्या आहेत तर प्रशासनाने वेळेवर पंचनाम्याचा अहवाल शासनाला सादर न केल्यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहिलेत. सरकारी अधिकाऱ्यांच्या अजब कारभारामुळ शेतकऱ्यांमध्ये संतप्त आहेत. काल राज्यसरकारने मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांना मदत जाहीर केल्यानंतर आता जालना जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार, या शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे जालना जिल्हा दौऱ्यावर , नुकसानग्रस्त भागाची करणार पाहणी*कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज जालना जिल्हा दौऱ्यावर आहेत जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची ते पाहणी करणार आहेत.जालन्यातील बदनापूर तालुक्यातील सोमठाणा आणि अंबड तालुक्यातील वडीगोद्री परिसरामध्ये ते नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. अतिवृष्टीमुळे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा खरीपातील पिकांचे अतोनात नुकसान झाला आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आहे. यावर कृषिमंत्री काही बोलतात का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे..
Monsoon Rain Maharashtra: शुक्रवारपासून पुन्हा पाऊस वाढणार; पुढील ५ दिवस राज्यात ठिकठिकाणी पावसाची शक्यताराज्यातील काही भागात ढगाळ हवामानासह पाऊस हजेरी लावत आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. पुढील ५ दिवस राज्यातील काही भागातही पावसाचा अंदाज असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
आज राज्यभारात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली. आज मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
JALGAON | भुसावळ तालुक्यातील वरणगाव परिसराला पावसाने जोरदार झोडपले, वरणगावच्या भोगावती नदीला पूर, अनेक दुकानांमध्ये पाणीच पाणीभुसावळ तालुक्यातील वरणगाव परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस बरसला त्यामुळे वरणगाव शहराच्या मध्यभागातून वाहणार्या भोगावती नदीला पूर आला आहे, नदी लगत असणाऱ्या अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने दुकानदाराची तारांबळ उडाली.
भुसावळ तालुक्यातील वरणगाव सुश्री पिंपळगाव आचेगाव तळवेल हातनुर पुलगाव या भागामध्ये आज रात्री अचानक ढगफुटी सदृश्य पाऊस बरसला विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यामध्ये आलेल्या पावसाने हातात तोंडाशी आलेली पिके हे पाण्यात वाहून गेली आहेत ,वरणगाव शहराच्या मध्यभागातून वाहणारी भोगावती नदीलाही पूर आला आहे, त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे ,पुराचे पाणी नदीलगत असणाऱ्या दुकानांमध्ये घुसल्याने लाखो रुपयाचे दुकानदाराचे यामध्ये नुकसान झाले आहे.
हिंगोली मधील भांडेगाव गोळीबाराने हादरले, 20 वर्षाचा तरुण ठार दोघे गंभीर जखमीहिंगोली जिल्हा गोळीबाराच्या घटनेने हादरला आहे , हिंगोली तालुक्यातील भांडेगाव मध्ये रात्रीच्या सुमारास जुन्या वादातून एका व्यक्तीने तिघांवर बेधुंद गोळीबार केला आहे, या घटनेत वीस वर्षाचा तरुण जागीच ठार झाला आहे तर इतर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत दरम्यान शिवराज कुंडलिक जगताप असे गोळीबाराच्या घटनेत ठार झालेल्या तरुणाचे नाव असून हिंगोली पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला तातडीने ताब्यात घेत त्याच्या जवळील पिस्तुल जप्त केल्याची माहिती दिली आहे , धक्कादायक बाब म्हणजे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या सुभाष कुरवाडे नावाच्या व्यक्तीवर देखील दोन गोळ्या झाडण्यात आल्याने त्यांच्या मानेला गंभीर दुखापत झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा लातूर जिल्हा दौरा कार्यक्रममुख्यमंत्री फडणवीस यांचे दुपारी १.३० वाजता हेलिकॉप्टरने औसा येथे आगमन होईल. दुपारी २ वाजता ते उजनी येथील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतील व औसाकडे प्रयाण करतील. औसा येथून दुपारी ३.१० वाजता हेलिकॉप्टरने निलंगा तालुक्यातील नणंद येथे त्यांचे आगमन होईल. दुपारी ३.४५ वाजता औराद शहाजनी येथील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतील. त्यानंतर नणंद येथून हेलिकॉप्टरने लातूरकडे प्रयाण करतील. सायंकाळी ५.१० वाजता लातूर येथून विमानाने प्रयाण करतील