Asia Cup 2025 Scenario : श्रीलंकेला हरवूनही पाकिस्तानी टीम फायनलच्या शर्यतीतून OUT होऊ शकते, असं आहे समीकरण
Tv9 Marathi September 24, 2025 09:45 PM

Asia Cup 2025 Scenario : आशिया कप 2025 च्या साखळी फेरीत श्रीलंकन टीमने शानदार प्रदर्शन करुन आपले सर्व सामने जिंकले होते. पण सुपर-4 राऊंडमध्ये त्यांना धक्का बसला. सुपर-4 राऊंडमध्ये दोन्ही सामने गमावून श्रीलंकन टीम आता बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर आहे. श्रीलंकेच्या टीमला फायनलमध्ये पोहोचण्यासाठी दुसऱ्या टीमच्या निकालांवर अवलंबून रहावं लागेल. पाकिस्तानने भले श्रीलंकेवर विजय मिळवला असेल, पण त्यांची टीम सुद्धा स्पर्धेबाहेर जाऊ शकते. त्यासाठी सुपर-4 मधील चौथी टीम बांग्लादेशला मोठा उलटफेर घडवावा लागेल.

आशिया कप 2025 स्पर्धा शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. सुपर-4 राऊंडमधील फक्त तीन सामने बाकी आहेत. फायनलची शर्यत अजूनही ओपन आहे. भारत आणि बांग्लादेशने सुपर-4 मध्ये आपल्या अभियानाची सुरुवात विजयाने केली होती. 23 सप्टेंबर रोजी पाकिस्तानने श्रीलंकेला 5 विकेटने हरवून फायनलमध्ये पोहोचण्याच्या आपल्या अपेक्षा जिवंत ठेवल्या आहेत. पाकिस्तानच्या विजयामुळे आशिया कप स्पर्धेची फायनल भारत-पाकिस्तानमध्ये होण्याची शक्यता कायम आहे. श्रीलंकेने सुपर-4 मध्ये दोन सामने गमावल्यामुळे ते बाहेर होण्याच्या उंबरठ्यावर आहेत.

पॉइंट्स टेबलची स्थिती काय?

श्रीलंकेवर विजय मिळवून पाकिस्तान सुपर-4 च्या पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचलाय. भारत, बांग्लादेश आणि पाकिस्तानचे आता प्रत्येकी दोन-दोन पॉइंट्स आहेत. पण नेट रन रेटच्या बाबतीत पाकिस्तानची टीम पुढे आहे. टीम इंडिया +0.689 टॉपवर आहे. पाकिस्तान +0.226 सह दुसऱ्या स्थानावर आहे. बांग्लादेश +0.121 सह तिसऱ्या स्थानावर आहे. दोनपैकी एकही मॅच जिंकू न शकलेला श्रीलंका बाहेर होण्याच्या उंबरठ्यावर आहे.

आजच्या सामन्यात भारत जिंकल्यास

सुपर-4 मधील चौथा सामना भारत आणि बांग्लादेशमध्ये होईल. टीम इंडियाने या सामन्यात बांग्लादेशला हरवलं, कर श्रीलंका टुर्नामेंट बाहेर जाईल. टीम इंडियाचा फायनलमध्ये प्रवेश होईल. अशावेळी 25 सप्टेंबरला पाकिस्तान आणि बांग्लादेशमधील सामना सेमीफायनल सारखा असेल. जी टीम जिंकेल तीच फायनलमध्ये खेळेल.

भारत हरल्यास

दुसरीकडे बांग्लादेशने भारताला हरवलं, तर सुपर-4 ची लढाई ओपन राहिलं. चारही टीमच्या फायनल प्रवेशाची शक्यता कायम राहिलं. अशा स्थितीत भारत आणि पाकिस्तान दोन्ही टीम्सना फायनलमध्ये पोहोचण्यासाठी आपपाले सामने जिंकावेच लागतील. बांग्लादेशची टीम चार पॉइंटसह टॉपवर राहिलं. श्रीलंकेच्या अपेक्षाही जिंवत राहतील. श्रीलंकेला आपला शेवटचा सामना भारताविरुद्ध खेळायचा आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.