Gold Silver Rate : अबब! सोने, चांदी विकत घेणे आता सामान्यांना न परवडणारा विषय, आणखी दर वाढणार; व्यापाऱ्यांनी व्यक्त केले मत
esakal September 24, 2025 07:45 PM

सोन्याचा उच्च दर: कोल्हापूरमध्ये मंगळवारी सोन्याचा प्रतितोळा दर एक लाख १८ हजार रुपये गाठला, तर चांदीचा प्रतिकिलो दर १ लाख ४१ हजार रुपये झाला.

दर वाढीची कारणे: डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयांचे अवमूल्यन, भू-राजकीय तणाव, मागणीपेक्षा कमी पुरवठा या कारणांमुळे सोन्याचा दर सतत वाढत आहे.

दर वाढीचा कालावधी: सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून आतापर्यंत सोन्याचा दर सुमारे १० हजार रुपये वाढला असून, दिवसभरात मंगळवारी सोन्यात ३ हजार आणि चांदीत ४ हजार रुपयांची वाढ झाली.

Gold Silver Price : सोने-चांदीच्या दरात वाढ सातत्याने सुरू आहे. कोल्हापुरात मंगळवारी सोन्याच्या प्रतितोळा दराने एक लाख १८ हजार रुपये इतका उच्चांकी दर गाठला. चांदीचा प्रतिकिलो दर १ लाख ४१ हजार रुपयांवर पोहोचला.

गेल्या आठवड्यात यंदाच्या वर्षातील शेवटच्या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी गुरुवारी सोन्याचा दर एक लाख १३ हजार ५०० रुपये होता. त्यानंतर सलग पाच दिवस सोन्याच्या दरामध्ये वाढ होत आहे. नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी सोन्याचा दर जीएसटीसहीत एक लाख १८ हजार रुपयांवर, तर चांदीचा दर एक लाख ४१ हजार रुपयांवर पोहोचला. सोन्याचा दर कोल्हापुरातील उच्चांकी ठरला आहे.

दरम्यान, डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयांचे झालेले अवमूल्यन, भू-राजकीय तणाव, मागणीच्या तुलनेत कमी असलेला पुरवठा आदी कारणांमुळे सोन्याच्या दरामध्ये वाढ होत असल्याचे कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांनी सांगितले.

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून आतापर्यंत सोन्याच्या दरात दहा हजार रुपयांची वाढ झाली आहे. मंगळवारी दिवसभरामध्ये सोन्याच्या दरात तीन हजार रुपये, तर चांदीच्या दरामध्ये चार हजार रुपयांची वाढ झाली असून, या दरांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष राजेश राठोड यांनी व्यक्त केली.

Gold Rate Today : नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशीही सोन्याच्या दरात वाढ, तब्बल १२०० रुपयांनी महागलं...आजचा दर काय?

प्र.१. कोल्हापूरमध्ये मंगळवारी सोन्याचा दर किती होता?

उ.१. प्रतितोळा एक लाख १८ हजार रुपये.

प्र.२. चांदीचा दर किती होता?

उ.२. प्रतिकिलो १ लाख ४१ हजार रुपये.

प्र.३. सोन्याच्या दरात वाढ का होत आहे?

उ.३. डॉलरच्या तुलनेत रुपयांचे अवमूल्यन, भू-राजकीय तणाव, मागणीपेक्षा कमी पुरवठा ही मुख्य कारणे आहेत.

प्र.४. सप्टेंबरमध्ये सोन्याचा दर किती वाढला आहे?

उ.४. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून आतापर्यंत सुमारे १० हजार रुपयांची वाढ झाली आहे.

प्र.५. पुढील काळात दर वाढण्याची शक्यता आहे का?

उ.५. कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष राजेश राठोड यांच्या मते, दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.