INDA vs AUSA : ऑस्ट्रेलियाच्या शेपटाने रडवले; ८ बाद २७४ वरून ४२० धावांपर्यंत पोहोचले! Manav Suthar याने ५ विकेट्स घेऊन सावरले
esakal September 24, 2025 07:45 PM
  • भारत अ विरुद्ध ऑस्ट्रेलिया अ दुसरा चार दिवसीय सामना लखनौ येथे खेळवला जात आहे.

  • मानव सुतारने १०७ धावांत ५ विकेट्स घेत भारताला मोठा दिलासा दिला.

  • नॅथन मॅकस्वीनी (७४) व सॅम कॉन्स्टास (४९) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८६ धावांची भागीदारी केली.

India A vs Australia A unofficial Test match scorecard Marathi : भारत अ विरुद्ध ऑस्ट्रेलिया अ यांच्यात दुसरा चार दिवसीय सामना लखनौ येथे खेळवला जातोय. आगामी वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी होत असलेला हा सामना टीम इंडियात जागा मिळवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. लेफ्ट आर्म स्पिनर मानव सुतार ( Manav Suthar) याने संधीचं सोनं केले. त्याने ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ तंबूत पाठवला. पण, ऑस्ट्रेलियाच्या दहाव्या व अकराव्या क्रमांकावरील फलंदाजांनी भारताची डोकेदुखी वाढवली.

मागील सामन्यातील शतकवीर सॅम कॉन्स्टासने ९१ चेंडूंत ४९ धावा करताना दुसऱ्या विकेटसाठी कर्णधार नॅथन मॅकस्वीनीसह १६४ चेंडूंत ८६ धावांची भागीदारी केली. नॅथनने १६२ चेंडूंत १० चौकारांच्या मदतीने ७४ धावा केल्या. त्यानंतर ऑलिव्हर पिकने ( २९) व कूपर कोनोली ( ०) यांना फार कमाल दाखवता आली नाही. मानव सुतारने यांना माघारी पाठवले. मोहम्मद सिराजने सलामीवीर कॉन्स्टासला बाद केले.

IND vs BAN Live : लाचार पाकिस्तान! इच्छा नसताना भारताच्या विजयासाठी प्रार्थना करावी लागणार; भावाशी करणार गद्दारी

जोश फिलिप्पे व नॅथन यांनीही ५९ चेंडूंत झटपट ५२ धावा झोडल्या. ऑस्ट्रेलियाचे ८ फलंदा २७४ धावांवर बाद झाल्यानंतर भारताची पकड मजबूत झाली होती. पण, टोड मर्फी, जॅक एडवर्ड्स व हेन्री थॉर्नटन यांनी जबदरस्त खेळ केला. मर्फी व एडवर्ड्स या जोडीने ९ व्या विकेटसाठी ६८ चेंडूंत ५५ धावा जोडल्या. मर्फी व थॉर्नटन यांनीही ९६ चेंडूंत ९१ धावांची भागीदारी करून संघाला ४२० धावांपर्यंत पोहोचवले.

IND vs BAN Playing XI : जसप्रीत बुमराह ऐवजी अर्शदीप सिंगला संधी? बांगलादेशविरुद्ध कशी असेल भारताची प्लेईंग XI?

मर्फी ८९ चेंडूंत १२ चौकार व १ षटकारासह ७६ धावांवर बाद झाला. जॅक एडवर्ड्सने ७८ चेंडूंत ८८ धावा करताना ११ चौकार व १ षटकार खेचला. थॉर्नटन ४६ चेंडूत ३२ धावांवर नाबाद राहिला. भारताच्या फिरकीपटू मानव सुतारने १०७ धावांत ५ विकेट्स घेतल्या. गुरनूर ब्रारने ७५ धावांत ३ विकेट्स घेतल्या, मोहम्मद सिराज व प्रसिद्ध कृष्णा यांना प्रत्येकी एका विकेटवर समाधान मानावे लागले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.