नाभिक बांधवांची एकजूट प्रेरणादायी
esakal September 25, 2025 05:45 AM

swt2336.jpg
93752
मालवण ः दत्ता सामंत यांच्या हस्ते आतू फर्नांडिस मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.

नाभिक बांधवांची एकजूट प्रेरणादायी
दत्ता सामंत ः मालवणात भजन महोत्सवाचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २३ : देवी भैरवी बाळगोपाळ मित्रमंडळाने सलग तेरा वर्षे भजन सेवेतून देवीची आराधना आणि आशीर्वाद मिळविले आहेत. अशाप्रकारे परमेश्वर भेटीचा आनंद भजनात तल्लीन होणाऱ्या भाविकांना होत असतो. भजनातून होत असलेले संस्कार आणि दिशादर्शक प्रबोधन सर्वांनाच महत्त्वाचे असते. परमेश्वराशी संवाद साधण्यासाठी भजनसेवा ही एक अत्यानंद मिळवून देणारी आहे. नाभिक समाज बांधवांची एकी आणि त्यातून निर्माण होत असलेले उत्सव यामुळे त्यांच्या उपक्रमांमध्ये सहभागी होत असताना आपल्या गावातीलच उत्सव असल्याचे वाटत आहे, असे प्रतिपादन उद्योजक दत्ता सामंत यांनी केले.
मालवण बाजारपेठेतील संत सेना महाराज मार्गावरील भैरवी देवालयातील भजन महोत्सवाचे उद्घाटन उद्योजक सामंत यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाभिक समाजाचे नेते विजय चव्हाण होते. प्रास्ताविकात अॅड. पलाश चव्हाण यांनी भैरवी मंदिरच्या उभारणीचा व भजन महोत्सव आयोजनाचा आढावा घेतला. स्वागत मंडळाचे अध्यक्ष अंकुश चव्हाण व नाभिक समाजाचे माजी तालुकाध्यक्ष विजय चव्हाण यांनी केले.
यावेळी प्रमुख पाहुणे सुदेश आचरेकर, शिवसेना शहरप्रमुख दीपक पाटकर, व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर, उद्योजक नितीन तायशेटे, उद्योजक विजय केनवडेकर, नाभिक समाज नेते विजय चव्हाण, जिल्हाध्यक्ष जगदीश चव्हाण, तालुकाध्यक्ष भाऊ चव्हाण, माजी तालुकाध्यक्ष आनंद आचरेकर, स्मृती कांदळगावकर, उद्योजक अनिल मालवणकर, मनोज चव्हाण आदी उपस्थित होते. बुवा केतन आजगावकर यांचा तसेच गोमाता रक्षणासाठी मोफत वकिली सेवा बजावणारे अॅङ. चव्हाण यांचा सत्कार मंडळातर्फे करण्यात आला.
सुदेश आचरेकर यांनी, मंडळाच्या उपक्रमांचा फायदा सर्व समाजाला होत असल्याने मंडळाचे कार्य गौरवास्पद असल्याचे सांगितले. विजय केनवडेकर यांनी, भैरवी मित्रमंडळ संगीत आणि नामस्मरणात आपल्या दर्जेदार उपक्रमातून पुढाकार घेत आहे, असे कौतुकोद्गार काढले. जिल्हाध्यक्ष जगदीश चव्हाण, विजय चव्हाण यांनी मंडळाच्या कार्याचे कौतुक केले. सूत्रसंचालन अॅड. चव्हाण यांनी केले.
मालवण बंदरजेटी येथे हरी खोबरेकर व आतू फर्नांडिस मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोफत गणपती विसर्जन सेवा उपलब्ध करून दिली होती. समुद्राला मोठी भरती असतानाही जीव धोक्यात घालून गणपती विसर्जन चांगल्याप्रकारे पार पाडल्याबद्दल मंडळाच्या वतीने सामंत यांच्या हस्ते हरी खोबरेकर व आतू फर्नांडिस मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांचा भेटवस्तू, शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.