BJP office burnt : लडाखमध्ये तरुणाईचा भडका, भाजपचं कार्यालय पेटवलं; 'या' मागणीने जोर धरल्याने वाढली मोदी सरकारची चिंता
Sarkarnama September 25, 2025 05:45 AM

थोडक्यात महत्वाचे :

  • तरुणाईच्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले, पोलिसांच्या गाड्या व भाजप कार्यालय पेटवले.

  • मुख्य मागणी: लडाखला राज्याचा दर्जा व संविधानिक अधिकार द्यावेत, यासाठी आंदोलन सुरू असून 6 ऑक्टोबरला केंद्र सरकारसोबत बैठक नियोजित आहे.

  • स्थिती नियंत्रणात: दगडफेक, आगजनीनंतर अतिरिक्त पोलिस दल तैनात करून परिस्थिती नियंत्रणात आणली गेली.

  • BJP Office Set on Fire Amid Growing Anger : लेह-लडाखमध्ये आज तरुणाईचा भडका उडाला. युवकांनी सुरू केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर पोलिसांच्या गाड्या पेटवण्यात आल्या. दगडफेकही करण्यात आली. तसेच भाजपच्या कार्यालयावर हल्ला करत ते पटवून देण्यात आले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्यानंतर अतिरिक्त पोलीस दलाला तैनात करण्यात आले.

    लडाखला राज्याचा दर्जा द्यावा आणि संविधानिक अधिकार बहाल करावे, या मागणीसाठी तरुणांचे आंदोलन सुरू आहे. आज लडाख बंदची घोषणाही करण्यात आली होती. केंद्र सरकारने येत्या ६ ऑक्टोबर रोजी लडाखमधील प्रतिनिधींसोबत चर्चेसाठी बैठक बोलावली आहे. पण त्याआधीच लडाखमध्ये आंदोलनाचा भडका उडाल्याने केंद्र सरकारची चिंता वाढली आहे.   

    सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे मागील काही दिवसांपासून उपोषण करत आहेत. त्यांच्यासोबत असलेल्या इतर कार्यकर्त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. मागील १५ दिवसांपासून लडाखमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाची व्यापी आता वाढू लागली आहे. वांगचुंक यांच्यासोबत तरूण, महिलाही आंदोलनाला बसल्या आहेत.

    Supreme Court News : बायकोची आमदारकी नवऱ्याच्या डोळ्यात खुपली; सुप्रीम कोर्टाने नेत्याची फिरकी घेत दाखवला आरसा...

    दोन महिला आंदोलकांना रुग्णालयात भरती केल्यानंतर इतर आंदोलकांमध्ये रोष वाढत गेला. त्यानंतर आंदोलक आक्रमक झाले. पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. सरकार कार्यालयांनाही निशाणा करण्यात आला. आंदोलकांनी पोलिसांच्या गाड्या पेटवल्या. जवळ असलेल्या भाजपच्या कार्यालयालाही आग लावण्यात आली.

    पोलिसांकडून आंदोलकांना रोखण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. लाडीमारही करण्यात आला. पण आंदोलन अधिकच चिघळत गेले. अखेर पोलिसांनी अतिरिक्त पोलिस दलाला पाचारण करावे लागले. त्यानंतर हे आंदोलन पोलिसांच्या आवाक्यात आले. सध्या येथील स्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. 

    Top 10 News : काँग्रेस नेत्याला साडी नेसवणं महागात, पत्नीची आमदारकी डोळ्यात खुपली, हाकेंच्या कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला... वाचा महत्वाच्या घडामोडी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

    Q1: लडाखमध्ये आंदोलन का सुरू झाले आहे?
    A: राज्याचा दर्जा व संविधानिक अधिकारांच्या मागणीसाठी.

    Q2: आंदोलन हिंसक कसे झाले?
    A: पोलिसांवर दगडफेक व गाड्यांना आग लावल्याने.

    Q3: भाजपच्या कार्यालयाला काय झाले?
    A: आंदोलकांनी त्याला आग लावली.

    Q4: पुढील पाऊल काय आहे?
    A: 6 ऑक्टोबरला केंद्र सरकार व लडाख प्रतिनिधींची बैठक होणार आहे.

    © Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.