छत्रपती संभाजीनगर : पूर्वी वयस्कर लोकांमध्ये दिसणारी समस्या हिप जॉइंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया आता तरुणांवरदेखील करावी लागत आहे. विशेष म्हणजे, ही शस्त्रक्रिया करून घेणाऱ्यांत तरुणांची संख्या अधिक आहे.
यामागे ‘एव्हीएन’ (ॲव्हस्कुलर नेक्रोसिस) हे प्रमुख कारण आहे. परंतु, सध्या शहरात उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक उपचारांमुळे या शस्त्रक्रियेनंतरही तरुणांना सर्वसामान्यांप्रमाणे आयुष्य जगणे शक्य झाले आहे, असे मत ऑर्थोस्कोपी आणि जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. श्रीपाद जोशी आणि स्पाइन आणि जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. लक्ष्मीकांत दागडिया यांनी ‘सकाळ संवाद’मध्ये व्यक्त केले.
ते म्हणाले, ‘‘कोविड काळानंतर एव्हीएनच्या रुग्णांत वाढ झाली. पूर्वी ५० ते ६० रुग्ण आढळत, तर आता हा आकडा शंभरावर गेला. विशेष म्हणजे, या आजाराच्या रुग्णांमध्ये जवळपास ४० टक्के रुग्ण चाळीशीच्या आतील असल्याचे निरीक्षण आहे. प्रारंभी या आजाराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्याने आजार वाढत जातो. परिणामी, हिप जॉइंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करण्याची गरज रुग्णांना पडत आहे. कोविडमध्ये औषधोपचारात स्टिरॉइडचा अधिक वापर झाल्याने ही रुग्णसंख्या वाढण्यामागील एक कारण असू शकते,’’ असे निरीक्षणही त्यांनी नोंदवले.
अशी आहेत काही कारणे
व्यसनांचे अतिप्रमाण
स्टिरॉइड औषधांचा वापर
एव्हीएन
या आजारात सांध्यांना रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. यामुळे सांध्यांना व्यवस्थित रक्तपुरवठा होत नाही. परिणामी, त्यांची झीज होते. यात अगोदर बॉल खराब होतो. नंतर वाटी आणि पूर्ण सांधा. यानंतर हिप जॉइंट रिप्लेसमेंट करावे लागते.
स्ट्रायकर मॅको रोबो उपचारहिप जॉइंट आणि गुडघा प्रत्यारोपणात आता स्ट्रायकर मॅको रोबो उपचार ही अत्याधुनिक पद्धती उपलब्ध झाली. मुंबई, पुण्यानंतर छत्रपती संभाजीनगर शहरातच ही पद्धती आमच्याकडे उपलब्ध आहे. या पद्धतीत इमेज बेस्ट रोबो म्हणजेच सीटीस्कॅन, अचूक मेजरमेंट आणि मुव्हमेंट कॅच केली जाते. यामुळे शस्त्रक्रियेची अचूकता वाढते. परिणामी, या पद्धतीत चांगले निकाल दिसून येतात. यासह रिअल टाइम इमेजिंगही या पद्धतीत उपलब्ध आहे.
स्ट्रायकर मॅको रोबो उपचाराचे फायदे
शस्त्रक्रियेत अचूकता
शस्त्रक्रियेदरम्यान रक्तप्रवाह कमी
शस्त्रक्रियेतील जखम, व्रण कमी
प्रत्यारोपित सांध्यांचे आयुर्मान वाढते
रुग्णालयातून लवकर सुटी मिळते
शस्त्रक्रिया झालेल्या अवयवांची हालचाल जलद होते
ज्येष्ठांचे प्रमाण अधिक
गुडघा प्रत्यारोपणात ज्येष्ठांचे प्रमाण अधिक
तीन टक्के लोकांमध्ये पुनःप्रत्यारोपणाची गरज
मुंबई, पुण्याच्या तुलनेत शहरात स्वस्तात शस्त्रक्रिया
गुडघा प्रत्यारोपण केलेला रुग्ण तीन दिवसांत वॉकरशिवाय चालतो
गुडघा आणि हिप जॉइंट रिप्लेसमेंटसाठी हीच शस्त्रक्रिया योग्य