खेड (पुणे) : चाकण औद्योगिक क्षेत्रातील नाणेकरवाडीत रिक्षाला कट मारल्याच्या कारणावरून वाद उद्भवला होता. या वादानंतर एका तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करणाऱ्या आणि आम्ही संपलेलो नाही असा संदेश देत रिलच्या माध्यमातून दहशत निर्माण करण्यात आली होती. या तरुणांना चाकण पोलिसांनी चांगली अद्दल घडवली असून दहशत केली तिथंच आरोपींची धिंड काढत पोलिसांनी चाकण औद्योगिक क्षेत्रात ऍक्शन मोड दाखवला आहे.
रस्त्यावर दादागिरी करत दहशत निर्माण करणाऱ्यांची संख्या कमी नाही. अनेक जण तर सोशल मीडियावर याचे रिल्स बनवून टाकत असतात. अशांविरोधात पोलीसदेखील ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. अशाच प्रकारे चाकण औद्योगिक क्षेत्रातील परिसरात दहशत माजविणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांना अद्दल घडवत धिंड काढली आहे.
शिंदे सेनेच्या फरार नेत्यावर गुन्हा; रॅप साँग, गँगस्टर अन् PP कंपनीचा उल्लेख; व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरलआम्ही संपलो नसल्याचे म्हणत माजविली दहशत
दसऱ्याच्या रात्री नाणेकरवाडी परिसरातील श्रीराम मंडळाजवळ रिक्षाला कट मारल्याच्या कारणावरून फिर्यादी श्रीकांत शिंदे यांच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणात रेकॉर्डवरील आरोपी रजित येरकर, ओम नाणेकर, स्वप्नील कांबळे आणि हरिओम नाईकवाडे यांनी सोशल मीडियावर “आम्ही संपलेलो नाही” असा रिल पोस्ट करत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला होता.
Bhokardan Nagar Parishad : भोकरदन नगरपरिषद प्रभागाच्या मतदार यादीत सावळा गोंधळ; ६५० तक्रारी दाखलनांदेड जिल्ह्यातून घेतले ताब्यात
दरम्यान चाकणपोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथील पेट्रोल पंपावर सापळा रचत चौघांनाही ताब्यात घेतले. पोलिस उपायुक्त बापू बांगर, एसीपी सचिन कदम आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रसन्न जऱ्हाड, पोउनिरी सचिन मोरखंडे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. औद्योगिक क्षेत्रात रिलच्या माध्यमातून दहशत निर्माण करणाऱ्यांविरुद्ध चाकण पोलिसांनी दाखवलेला हा अॅक्शन मोड सर्वत्र चर्चेचा विषय ठरला.