रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद
नवीन पनवेल, (बातमीदार) ः एमजीएम हॉस्पिटल कामोठे यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्ट, श्री पूज्य सिंधी पंचायत ट्रस्ट, आम्ही रक्तदाते पनवेलचे, विद्यार्थी वाहक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने थॅलेसेमिया रुग्णांच्या मदतीकरिता हे शिबिर राबविण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन ॲड. मनोहर सचदेव, ॲड. अमोल साखरे, डॉ. रमेश पटेल, पांडुरंग हुमणे यांच्या उपस्थितीत झाले. या शिबिरात एकूण १०७ रक्तदात्यांनी सहभाग घेतला. यावेळी अवयव दान या विषयावर इंदुमती ठक्कर यांनी समुपदेश केला. यावेळी रक्त शर्करा व इसीजीची मोफत तपासणी करण्यात आली. हे शिबिर यशस्वी करण्याकरिता मुरलीधर ढाके, वर्षा ढाके, संगीता साखरे, उज्वला भिसे, सचिन भिसे, भूषण चोणकर, किसन रौंदळ यांनी विशेष परिश्रम घेतले.