नंदुरबारमध्ये भाजपला धक्का.
माजी आमदार शिंदे गटात जाणार.
एकनाथ शिंदेंच्या उपस्थित पक्षप्रवेश होणार.
सर्व राजकीय पक्षांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहे. प्रत्येक नेत्याने मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. कुठे पक्षफोडीचं राजकारण तर, कुठे मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. अशातच नंदुरबारमध्ये महायुतीतच फूट पडली असल्याचं चित्र आहे. भाजपचे माजी आमदार यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. हा पक्षप्रवेश सोहळा मुंबईतील एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी पार पडणार आहे.
नंदुरबारचे सुपुत्र आणि अमळनेर विधानसभेचे माजी आमदार शिरीष चौधरी हे भाजप पक्षात आहेत. मात्र, आता त्यांनी भाजप पक्षाला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला आहे. शिरीष चौधरी यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत शिरीष चौधरी यांनी भाजप पक्षाला पाठिंबा दिला आहे.
लेकीच्या प्रेम विवाहाला कडाडून विरोध, जावईच्या आईला जिवंत जाळलं, मुलीच्या आई - वडिलांचा प्रतापभाजप पक्षात राहून त्यांनी अमळनेर विधानसभेचा विकास केला आहे. मात्र, त्यानंतर चौधरी यांचा पराभव झाला. आता त्यांनी शिवसेना शिंदे गटात जाण्यात निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत चौधरी धनुष्यबाण हाती घेणार आहेत. हा पक्षप्रवेश सोहळा उद्या मुंबईतील एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी पार पडणार आहे.
निवडणुकीपूर्वी माजी रेल्वे मंत्र्यांच्या परिवाराला धक्का, IRCTC हॉटेल प्रकरणात अख्ख कुटुंब अडकणारमिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर येथील २५ माजी नगरसेवक, नंदुरबार येथील २० माजी नगरसेवक, १०० सरपंच तसेच कार्यकर्त्यांसोबत शिरीष चौधरी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणकीच्या तोंडावर शिरीष चौधरी यांनी भाजपची साथ सोडल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.