La Nina : अतिवृष्टीनंतर राज्यावर आणखी एक संकट, आताच तयारीला लागा, IMD ने दिला गंभीर इशारा
Saam TV October 14, 2025 03:45 AM

IMD forecast How La Niña impacts Indian winters : अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकरी होरपळलाय. धो धो पडणाऱ्या पावसामुळे जमिनी खरडून गेल्या अन् पिके मुळासकट उपटून निघाली. जनावरांचा मृत्यू झाला. या नैसर्गिक आपत्तीतून शेतकरी राजा अद्याप सावरलेला नाही. तोच राज्यावर नवे संकट ओढावले आहे. La Nina च्या प्रभावामुळे यंदा कडाक्याची अन् हाडं गोठवणारी थंडी पडू शकते, असा अंदाज वर्तवला आहे. राज्यातून मान्सून माघारी परतलाय, पण ऑक्टोबर हीटमुळे सध्या अंगातून घामाच्या धारा निघत आहे. पहाटे हवेत प्रचंड गारवा जाणवायला लागलाय. तर दुपारी कडाक्याचे ऊन पडलेले असते. (Is 2025 winter going to be cold in India?)

पुढील काही दिवसानंतर राज्यात थंडीचा प्रभाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडीपासून वाचण्यासाठी आताच तयारीला लागा. दिवाळीनंतर राज्यात थंडीची लाट येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. La Nina तापमानात प्रचंड घट होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जातोय. त्यामुळेच यंदा तीव्र हिवाळा जाणवणार असे हवामान विभागाने सांगितले. दिल्लीसह उत्तर भारतात सध्या थंडीची चाहूल लागली आहे. राजधानीत कडाक्याची थंडी पडत आहे. काही दिवसांत थंडीची हीच लाट महाराष्ट्रातही येईल.

Local Body Election : निवडणुकीत भाजपला तुकडाही देणार नाही, अजित पवारांच्या आमदाराच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ कडाक्याच्या थंडीबाबत हवामान तज्ज्ञांचे नेमकं काय मत? How La Nina affects weather and rainfall in India

सध्या दिल्ली एनसीआरमध्ये कडाक्याची थंडी पडायला सुरूवात झाली आहे. हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमधील उंच भागात बर्फवृष्टी सुरू झाली आहे. त्यामुळे दिल्ली आणि उत्तरेकडील मैदानी भागातही तापमान घट होतेय. त्यामुळे यंदा लवकर हिवाळ्याला सुरूवात होईल, असा अंदाज आहे. सध्या हिमाचल प्रदेश आणि पंजाब या दोन्ही ठिकाणी तापमानात घट झाली. मध्य आणि पूर्व पॅसिफिक महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानात घट झाल्यामुळे ला निना परिस्थिती निर्माण झाली आहे, याचा परिणाम हवामानावरहोईल, असे हवामान तज्ज्ञांनी सांगितले.

मोठी बातमी! यशवंत बँकेत तब्बल ११२ कोटींचा घोटाळा, भाजप नेत्यावर गुन्हा, साताऱ्यात खळबळ

ऑक्टोबर अखेरनंतर 'ला निना'चा प्रभाव सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अतिप्रमाणातथंडीचा अंदाज मांडण्यात येत आहे. आयएमडीचा अंदाज आहे की, काही दिवसात ला निना प्रभाव सुरू होईल. या थंडीची तीव्रता नेमकी किती असेल, याचा अंदाज नोव्हेंबरमध्येच येणार आहे. जर ला निना प्रभाव ऑक्टोबरमध्ये सक्रिय झाला तर डिसेंबर आणि जानेवारीत तापमान अति प्रमाणात कमी होऊ शकते. (What is La Nina and its impact on India)

Maharashtra Election : एकनाथ शिंदेंना जबर धक्का, भाजप-राष्ट्रवादीची 'या' ठिकाणी झाली युती ला निना म्हणजे काय? What is La Niña?, El Niño Southern Oscillation (ENSO)

ला निनामुळे तापमानात मोठ्या प्रमाणात घट होते. त्यामुळे गारवा वाढतो. ला निना दरम्यान, पूर्वेकडील वारे (ENSO) समुद्राचे पाणी पश्चिमेकडे ढकलतात आणि समुद्राची पृष्ठभाग थंड करतात. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसात ला निनाचा प्रभाव सुरू होण्याच शक्यता आहे. त्यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच थंडीला सुरूवात होईल. Here is a look at La Niña and its impact on India.

Marathi vs Hindi clash : आम्ही आहोत म्हणून महाराष्ट्र टिकला, कल्याणमध्ये अमराठी महिलेची मुजोरी, हिंदीतूनच बोलण्यासाठी दमदाटी ला निना भारतावर काय परिणाम ? How will this La Niña impact India?

ला निना मुळे भारतामधील अनेक भागात कडाक्याची थंडी पडू शकते. याचा सर्वाधिक परिणाण उत्तरेकडील राज्यावर होईल. राजधानी दिल्लीसह उत्तरेकडील राज्यात थंडी लवकर येईल अ्न त्याचा काळ जास्त असेल. हिमाचल प्रदेश अन् इतर ठिकाणाच्या डोंगराळ प्रदेशात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी वाढू शकते. सध्या दिल्ली अन् एनसीआरमध्ये सर्वांनाच कडाक्याच्या थंडीचा प्रभाव जाणवू लागला आहे. हा प्रभाव भविष्यात आणखी वाढण्याची शक्यता आहे.

MMRDA : समृद्धीवरून थेट मुंबईत पोहोचता येणार, एमएमआरडीएचा नवा प्लॅन काय ?
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.